माहूर गडावर शारदीय नवरात्रौत्सव आढावा बैठक संपन्न…. नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर.

61
माहूर गडावर शारदीय नवरात्रौत्सव आढावा बैठक संपन्न.... नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर.

माहूर गडावर शारदीय नवरात्रौत्सव आढावा बैठक संपन्न….

नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर.

माहूर गडावर शारदीय नवरात्रौत्सव आढावा बैठक संपन्न.... नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर.

✍🏻गोपाल नाईक✍🏻
श्रीक्षेत्र माहूर. तालुका प्रतिनिधी.
मो.7499854591..

श्रीक्ष्रेत्र माहूर : साडेतीन शक्तिपिठापैकी मूळपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री.रेणुका गडावर आश्विन शूध्द प्रतिपदा ते विजया दशमी म्हणजेच दि.15 ऑक्टोबर. ते 24 आक्टों.पर्यंत संपन्न होणार्‍या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाबाबतची आढावा बैठक संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांचे अध्यक्षतेत व जिल्हाधिकारी अभिजित राऊत. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे. संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दादाराव शीनगारे. कोषाध्यक्ष तथा तहसिलदार किशोर यादव. नगराध्यक्ष फिरोज दोसानी.मुख्याधिकारी डॉ.राजकुमार राठोड. संस्थानचे विश्वस्त यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीत सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाचा आढावा सादर केला.
या बैठकीत न. पं. चे मुख्याधिकारी यांनी वाहनतळ,पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, आस्थाई मुतारी,स्वच्छता आदी बाबीची पूर्तता करणार असल्याची ग्वाही दिली.आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड यांनी विविध आगारातून ८० व माहूर आगाराच्या २० अशा एकूण १०० बसेस सेवा देणार असल्याचे सांगितले. विद्युत वितरण कंपनीचे प्रभारी उप अभियंता शेंडे. यांनी गुंज आणि किनवट येथून विद्युत पुरवठा खंडित झाल्यास अविरतपणे विद्युत पुरवठा करणार अशी वास्तव स्थिती मांडली. पो.नि. डॉ.नितिन काशीकर. यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवणार असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता वसंत झरिकर. यांनी आमच्या अधिपत्याखाली येणाऱ्या रस्त्याची डागडुजी करणार असल्याचे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र मच्छेवार यांनी औषधी साठ्यासह ३ रुग्णवाहिका व कर्मचाऱ्यासह जागोजाग पथक तैनात करणार असल्याचे मान्य केले.ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.आंबेकर यांनी ग्रामीण रुग्णालयात 30 खाटांचा कक्ष, तीन वैद्यकीय पथके व तिन रुग्णवाहिका सुसज्ज ठेवणार असे सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे. यांनी यात्राकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष यांनी यात्राकाळात तलाठी व मंडळ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. यात्रेशी निगडीत सर्व विभाग प्रमुखांनी आपली जबाबदारी निमुटपणे पार पाडावी कर्तव्यात कसूर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची तंबी दिली जिल्हाधिकारी अभिजीत राऊत.यांनी अन्न व औषधी प्रशासन, ,पुरातत्व विभाग, बँक, जिल्हा परीषद, पंचायत समिती,राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी इत्यादींनी आढावा बैठकीकडे पाठ फिरवली.सदर बैठकीत द पॉवर ऑफ मिडीयाचे तालुका अध्यक्ष विजय आमले. यांनी प्रशासनाचे आदेश झुगारून बैठकीस जाणीवपूर्वक दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी केली, पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सरफराज दोसाणी यांनी भाविकांनी दिलेल्या देणगीतून सुसज्ज यात्री निवास निर्माण करण्यात यावा यासह काही अपेक्षा व्यक्त केल्या.अध्यक्षीय समारोपातून जिल्हा न्यायाधीशांनी सर्वांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही दिली या बैठकीचे सुत्र संचालन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा संस्थानचे उपाध्यक्ष दादाराव शीनगारे यांनी केले तर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव कार्तिकेयन एस. यांनी आभार मानले. या बैठकीला प्रतिष्ठित नागरीक. पत्रकार, कर्मचारी उपस्थित होते.व्यवससथापक योगेश साबळे यानी या बैठकीचे उत्कृष्ट नियोजन केले होते….