गोरेगाव, लोणेरे विभागात उबाठाला खिंडार पहेल, उसरघर, दहिवली येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-गोरेगांव विधानसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले असून लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेले शिवसेनेतील इनकमिंग आजही सुरु आहे. महायुतीच्या काळात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांनी प्रेरीत होऊन गावच्या गावे शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
गोरेगांव लोणेरे विभागातील पहेल ,उसरघर व दहिवली येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आ. गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करीत आमदार गोगावले यांनी विरोधकांचा समाचार घेतला. महायुतीच्या काळात आम्ही केलेला विकास सर्वसामान्य जनतेला दिसत आहे. म्हणूनच ते शिवसेनेत सामिल होत आहेत.मात्र विरोधकांना हा विकास दिसत नाही. त्यांच्याकडे विकासाचे कोणतेच मुद्दे नसल्याने आपल्या तोंडातून गेलेल्या एखाद्या शब्दाचे भांडवल करून जनतेची दिशाभुल करीत आहेत. महाड येथील कार्यक्रमात समस्त महिलांचा अपमान होईल अस कोणतेच वक्तव्य केले नाही. काम करणारा भाऊ हवा की खोटं प्रचार करून दिशाभुल करणारी बहिण हवी अशीच साद घातली होती मात्र हेच म्हणणं आपले गावठी सर्वसामान्य जनतेला समजेल असे शब्द वापरून केले ते विरोधकांना झोंबले परंतु जनता सुज्ञ आहे त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही असा विश्वास आ. गोगावले यांनी व्यक्त केला .
यावेळी दसऱ्याच्या शुभ दिनी पहेल येथील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्वारकामाचा शुभारंभ करण्यात आला.