त्रिपुरा हिंसाचाराची आग अमरावतीत.

52

त्रिपुरा हिंसाचाराची आग अमरावतीत.

त्रिपुरा हिंसाचाराची आग अमरावतीत.

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
8208166961

अमरावती:- त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लीम समुदायाने पुकारलेल्या बंद दरम्यान प्रचंड दगडफेक झाली. त्याच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी अमरावती बंदची हाक दिली होती. या बंद दरम्यान शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकातून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करीत काही दुकानांना लक्ष्य केले. तोडफोड व जाळपोळही केली. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केला. एवढेच नाही, तर येथील चांदणी चौक भागात दोन समुदायांचे गट आमने-सामने आले होते. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबारही करावा लागला.