बीड जिल्हामध्ये अल्पवयीन मुलीवर 400 नराधमाने केला बलात्कार, त्यात एका पोलिसांचाही समावेश.
=== मुख्य मुद्दे ===
● बीड जिल्हात महिला अत्याचाराची संतापजनक घटना.
● पीडित अल्पवयीन मुलीचा झाला होता बाल विवाह.
● 400 नराधमानी केला बलात्कार, त्यात पोलीस कर्मचारी पण सामील.
✒️ श्याम भुतडा ✒️
बीड जिल्हा प्रतिनिधी
📲 9404118005 📲
बीड,13 नोव्हेंबर:- माघील अनेक दिवसापासुन राज्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी डोंबिवली याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. त्यामूळे संपुर्ण महाराष्ट्रात संताप्त व्यक्त केला होता. ही हादरवणारी घटना ताजी असताना, अमानुषतेच्या परिसीमा गाठणारी महाराष्ट्रा ला हादरवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हे प्रकरणं समोर आलं आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून ही महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत सहा महिन्यांच्या काळात तब्बल 400 नराधमानी तिच्यावर अत्याचार केला आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांनी तिचं एका तरुणासोबत बालविवाह लावून दिला होता. लग्नानंतर सासरी नवरा सांभाळत नसल्याने पीडित मुलगी आपल्या वडिलांकडे राहायला गेली. पण वडिलांनीही तिला सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे असहाय्य आणि निराधार झालेली ही अल्पवयीन मुलगी अंबाजोगाई बसस्थानकावर येऊन राहू लागली. एकट्या मुलीला पाहून गेल्या सहा महिन्यात तब्बल 400 नराधमानी तिच्यावर बलात्कार केला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हा प्रकार समोर आल्यानंतर बालकल्याण समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान या घटनेला वाचा फुटली आहे.
याप्रकरणी बालविवाह लावून दिल्याच्या कारणावरून वडिलांसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर अत्याचार करणाऱ्या तीन संशयित आरोपींवरही गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचा पुरवणी जबाब नोंदवला जाणार असून अत्याचार करणाऱ्या अन्य आरोपींची नावं यामध्ये उघड होणार आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.