अमरावती: मुस्लिम संघटनांकडून त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन, हिसंक वळण, 2 पोलीस जखमी.

49

✒मिडिया वार्ता न्यूज ✒

अमरावती:- त्रिपुरा राज्यामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक स्थिकानी निषेध आणि आंदोलन करण्यात येत आहे. त्यात अमरावती मध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात हजारो लोक जमा झाले होते. या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चाकरांनी जयस्तंभ चौकातील व शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली.

यावेळी मोर्चेकऱ्यांनी त्रीपुरा सरकार, भाजप विरोधात व आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आणि आपला निषेध व्यक्त केला. या दरम्यान पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते. तर यात दोन पोलीस कर्मचारी दगडफेक झाल्याने जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या मुस्लिम मोर्चाला पूर्णपणे हिंसाचाराचे गालबोट लागले आहे.