महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य यांचा एस टी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा.

46

महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य यांचा एस टी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा.

महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य यांचा एस टी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा.
महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य यांचा एस टी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा.

मीडिया वार्ता न्यूज

मुंबई : -महाराष्ट्र संरक्षण संघटना संलग्न ही बिगर राजकीय सामाजिक संघटना असून, ती महाराष्ट्रात मराठी भाषा जतन व संवर्धन आणि मराठी लोकांच्या हक्कांसाठी काम करीत आहे.
गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी दिवस रात्र सेवा देणारी अशी आपल्या सर्वांची लाडकी लाल परी, एस.टी बस व एस.टी कामगार वर्ग हे अविरत आणि प्रामाणिकपणे जनसेवा करीत आहेत. सणवार असो की पावसाळा असो, एस.टी कामगारांनी प्रामाणिक पणाने आपले कर्तव्य पार पाडले आहे. एवढंच नाही तर, अगदी कोरोना सारख्या काळात सुद्धा याच एस.टी कामगारांनी, आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड योद्धा होऊन मुंबई मधील जनसामान्यांसाठी प्रवास वाहतूक सुरू ठेवली होती. मराठी माणसांचा मानबिंदू असणाऱ्या एसटी कामगारांना आपल्या हक्कासाठी भांडावं लागणे, हे दुर्दैवच !

काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या एस.टी कामगार वर्गाचे, राज्यभरात जिल्हा तालुका स्तरावर  विविध मागण्यांसाठी जे आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला *महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या राज्यभरातील प्रतिनिधी, कार्यकर्ते, सदस्यांचा जाहीर पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदान, मुंबई येथे जाऊन जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.

आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात व मराठी कामगारांवर अन्याय होऊ नये यासाठी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठविण्यात येणार आहे. जाहीर पाठिंब्यासाठी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. धर्मेंद्र घाग, प्रमोद मसुरकर, श्रीकांत मयेकर, मंदार नार्वेकर, अजय कदम, विनोद जाधव, रवींद्र कुवेस्कर, साळवी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.