पिंपळगाव शेतशिवारात माकडांचा हैदोस, बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी.

राहूल भोयर, ब्रम्हपुरी प्रतिनिधी
ब्रह्मपुरी :- ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव शेत शिवारात गेल्या पंधरा दिवसापासून तीनशे जवळपास माकडांनी शेत शिवारात हैदोस घातला आहे. त्यामुळे शेतातील खरीप पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे वनविभाग प्रशासनाने या माकडांचा माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी केली दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले येथील शेत शिवारात गेल्या महिनाभरापासून माकडांनी हैदोस घातला आहे त्यामुळे खरीप हंगामात पेरणी केलेली पिके उडीद मूग बरबटी तुर व नगदी पीक भाजीपाला त्याच्या तोंडात नुकसान होत आहे माकडांचा हैदोस सुरू असून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकर्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सदर बंदरांचा ब्रह्मपुरी वनविभागाने बंदोबस्त करावा या मागणीसाठी पिंपळगाव भोसले शेतशिवारातील शेकडो शेतकऱ्यांनी ब्रह्मपुरी वनविभाग कार्यालयावर धडक दिली यावेळी दीपेश मल्होत्रा उपवनसंरक्षक व पुनम ब्राह्मणे वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर यांना माकडांच्या हैदोसामुळे होणारे नुकसानीची आपबिती शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबतचे निवेदनही दीपेश मल्होत्रा उपवनसंरक्षक वन विभाग ब्रह्मपुरी यांना दिले. मोकाट असलेल्या माकडांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी प्रा. अमृत नखाते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर, सुरेश दूनेदार, सरपंच पिंपळगाव भोसले, देविदास गडे तंटामुक्त समिती अध्यक्ष पिंपळगाव भोसले, भास्कर टिकले, अविनाश दोनाडकर, प्रीतम बागडे, चिंतामण सेलोकर यांनी यावेळी रेटून धरली.
सदर समस्येची गंभीर दखल घेत पुनम ब्राह्मणे वन परिक्षेत्र अधिकारी उत्तर यांनी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाची चमू पिंपळगाव भोसले शेतशिवारात पाठविण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतेवेळी मारुति कामडी, केवळराम पाटणकर, जनार्दन दोनाडकर, सुरेश कामडी, गणेश कामडी, पुरुषोत्तम प्रधान, देविदास मेश्राम, गोपाल कुथे व शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.