नगर पंचायतीचे आरक्षण सोडत निवडणूक आयोगाकडून रद्द, सुधारीत पध्दतीने सोडत आता 15 नोव्हेंबरला.

✒️ नीलम खरात ✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई:- महाराष्ट्र राज्यात आगामी होऊ घातलेल्या नगर पंचायत साठी निवडणुक आयोगाने आरक्षण जाहिर केल होते. पण काही वेळेतस आपला निर्णय मागे घेतला आहे. आता नवीन निर्णय 15 नोव्हेंबर रोजी येणार अशी माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्यात पुढे होऊ घातलेल्या 113 नगर पंचायतीचे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी काढलेले आरक्षण राज्य निवडणूक आयोगानी रद्द केले असून, नविन सोडत आता 15 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार असल्यांचे आदेश राज्य निवडणूक आयोगानी दिले आहे.
दिनांक 12 नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणाचे सोडतीत सर्वोच्च न्यायालयानी दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन होत नसल्यांचे दिसून आल्याने या सोडती रद्द करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन होईल यादृष्टीने नवे आरक्षण सोडत काढण्याचे आदेशही राज्य निवडणूक आयोगानी दिले आहे.