ब्रम्हपुरी: वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाची तहसीलदार यांनी घेतली दखल.
✍..राहुल भोयर ब्रम्हपुरी..✍
ब्रह्मपुरी:- तालुक्यातील वैनगंगा नदी पात्रातील अवैध रेती उत्खनन व तस्करी प्रकरणी वंचित बहुजन आघाडी ब्रह्मपुरी यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत ब्रम्हपूरीचे तहसीलदार श्रीमती उषा चौधरी यांनी ब्रह्मपुरी महसूल मंडळातील (ब्रह्मपुरी , अऱ्हेरनवरगाव,मेंडकी, गांगलवाडी ,चौगाण) या सर्व मंडळ अधिकारी यांना दिवसा तसेच रात्र पाळी मध्ये होणाऱ्या अवैध रेती तस्करी करणाऱ्यांवर कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे दिनांक 10 नोव्हेंबर 2021 ला आदेश दिले.
ब्रह्मपुरी तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व तस्करीचे प्रमाण कोरोना काळात खूप मोठ्या प्रमाणात या अवैध धंदयाला आळा घालण्याकरीता ब्रह्मपुरी तालुका वंचित बहुजन आघाडी ने निवेदनाद्वारे सदर बाब ब्रह्मपुरी तहसीलदार यांच्या लक्षात आणून दिली. तसेच या अवैध रेती तस्करांवर योग्य कार्यवाही ची मागणी देखील केली होती. त्यावर थेट तहसीलदार श्रीमती उषा चौधरी यांनी ब्रह्मपुरी येथील सर्व मंडळ अधिकारी यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश काढले.
सदर आदेश निघाल्याने आता तरी महसूल मंडळ अधिकारी या अवैध रेती तस्करांवर खरंच कार्यवाही करतात का, की आजपर्यंत जसे चालत होते तसेच चालणार या बाबीकडे वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे लक्ष देणार असल्याने या अवैध रेती तस्क रांनकडे मंडळ अधिकाऱ्यांनी व महसूल अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे असे आवाहन देखील वंचित बहुजन आघाडीने मिडयाआ वार्ता न्युजला माहिती देताना केले.