नागपुरात ८ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण
त्रिशा राऊत
नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं
मो 9096817953
नागपूर – कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिखली झोपडपट्टीतून ८ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करीत, दाम्पत्याला विकले. या प्रकरणाच्या तपसादरम्यान योगेंद्र प्रजापतीच्या कॉल डिटेल्समध्ये आलेल्या एका कॉलवरून पोलिसांनी वेगाने हालचाली करून जितेनला सुखरुप परत आणण्यात यश मिळविले.योगेंद्र प्रजापती आणि त्याची पत्नी रिटा यांनी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जितेनला फिरवून आणतो या बहाण्याने त्याचे अपहरण केले. दरम्यान बराच वेळ त्याची वाट बघत असताना आई राजकुमारी यांनी पती राजूलाही संपर्क करीत सांगितले. मात्र, अत्यल्प पगारावर काम करणाऱ्या राजूला त्याचे गांभीर्य न कळल्याने त्याने दुर्लक्ष केले. रात्री उशिरा परत आल्यावर त्यांनी कळमना पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तेव्हा पोलिसांनी त्याच्या क्रमांकाचे लोकेशन ट्रेस केले. त्याचे लोकेशन रेल्वे स्थानक असल्याने तो मुलास घेऊन निघून गेला असावा असा कयास लावण्यात आला. त्यामुळे युनिट २ आणि इतर पथकांनी कामठी, इतवारी, अजनी आणि मुख्य रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिस आयुक्तांनी लोहमार्ग पोलिस आणि कोटा येथील पोलिस अधिकाऱ्यांनी संपर्क साधून सूचना दिल्यात. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठेही प्रजापती जाताना न आढळल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावरुन केलेले कॉल ट्रेस केले.मात्र, नवा क्रमांक असल्याने त्यात काही वेळापूर्वी त्याने फरजाना उर्फ असार कुरेशी हिला संपर्क केल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेत विचारपूस केली. बबलू नामक ऑटोचालकानेच त्यांना एका दाम्पत्याला मुल हवे असल्याचे सांगितल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तत्काळ बबलूला ताब्यात घेतले. त्याने सचिन पाटीलचे नाव सांगून तो श्वेता खान यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले. त्यातून सचिन पाटील याला अटक करून विचारणा केली असता, सचिनने मुलाला नागपुरातील दाम्पत्याला मुलगा विकल्याची माहिती दिली.त्याच्या माध्यमातून चिमुकल्याला ताब्यात घेण्यात आले.कळमन्यात एका लॉजमध्ये व्यवस्थापक असलेले प्रकाश बुरेवार यांच्या घरी योगेंद्र भाड्याने राहत होता. त्याच्या प्रत्येक हालचालीवर ते लक्ष ठेवायचे. त्याच्या संशयास्पद वागणुकीमुळे ते नेहमीच त्याला टोकायचे. त्यातूनच तपासात त्यांची बरीच मदत झाली. तब्बल दोन तास त्यांनी प्रजापती याच्याबाबत माहिती दिली. त्याच्या घराची तपासणी केली असता, पोलिसांना लहान मुलांचे कपडेही सापडले.