किराणा दुकाणात भेसळयुक्त जिवनावश्यक वस्तुची जादा दराने विक्री, वजनमापेही सदोषयुक्त, अन्नऔषध प्रशासन अधिकारी ध्रुतराष्टाच्या भुमिकेत 

किशोर राऊत                 

 महागांव प्रतिनिधी

महागांव शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळें तालुक्यातील सर्वच गावचे नागरिक महागांव येथे किराणा दुकानाचे सामान खरेदी करण्यासाठी येतात सदर दुकानातुन गहु , तांदुळ, तेल ,डालडा ,तुरदाळ,उडीदाळ, शेंगदाण्यासह घरात लागणारी वस्तुची खरेदी करतात परंतु या जीवनावश्यक वस्तीमध्ये भेसळ केली जात आहे.

किराणादुकानातील तेलामध्ये रासायनीक प्रक्रिया केली जाते तर उडीददाळ तुरदाळ मुंगदाळ यामध्यें तत्सम पदार्थ भेसळ करुन त्यावर रासायनीक प्रक्रिया केली जाते किराणा दुकानदार ऊत्कृष्ट वस्तु असल्याचे सांगत भेसळयुक्त जीवनावश्यक वस्तुची जादा दराने विक्री केली जात आहे त्याचप्रमाणें किराणा दुकानातील वजनमापे ईलेक्ट्रॉनिक असल्यामुळें त्यामधे छेडछाठ केली जाते तर बहुंताश किराणादुकातील वजनमापे प्रमाणित केली गेली नाहीत त्यामुळे दरकिल्लोमागे १००,ते२०० वजन कमी येते दुकानात वस्तूचे भावफलक लावले नसल्याने ग्राहकाना वस्तुचे भाव माहीत नसल्याने ग्राहकाना जादा दराने वस्तुची खरेदी करावी लागत आहे त्यामुळें ग्राहकाची आर्थिक पिळवणूक होत आहे.

वस्तुचे पक्के बिलही दिले जात नाही एवढ्यामोठ्या प्रमाणात ग्राहकाची आर्थिक पिळवणूक होत असुनही जिल्ह्यास्तरावरील औषध व प्रशासन अधिकारी मात्र ध्रुतराष्टाच्या भुमिकेत राहुन आंधळे,मुके,बहीरेपणाचे सोंग घेत आहेत महागांव शहरातील सर्वच दुकानामध्ये भेसळयुक्त जीवनावश्यक वस्तुची जादा दराने विक्री केली जात असुन दुकानात सदोषयुक्त वजनमापे ,वस्तुचे भावफलक नसने दुकान व गोदामात स्वच्छता न ठेवणे इत्यादी ग्राहकांचे आर्थिक पिळवणूक चे प्रकार व त्याचप्रमाणे भेसळयुक्त जीवनावश्यक वस्तुची जादा दराने विक्री व त्यामुळे जनतेच्या आरोग्यावर होणारे दुरगामी दुष्पपरिणाम ग्राहकाना भोगावे लागत असल्याने जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालुन या गंभिर प्रकारावर आळा घालुन ग्राहकाची आर्थिक पिळवणुकितुन सुटका करून दिलासा देण्याची मागणी ग्राहकाकडून करण्यांत येत आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here