माधवी ताई जोशी युवा प्रतिष्ठानच्या विशेष सहकार्यातून गोरगरिबांच्या दिवाळीचा गोड शुभारंभ…

52

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, रोषणाईचा लखलखाट. अंधारा कडून प्रकाशाचे वाटेवर तेजोमय पावलांचा प्रवास. दिवाळी निमित्त आपण सर्वजण एकत्र येऊन स्नेहबंध जपत आनंदाने ,आपुलकीच्या भावनेने हा सण साजरा करत असतो.
माधवी ताई जोशी युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा, समाजसेविका सौ. माधवी ताई जोशी आणि सुप्रसिद्ध उद्योजक नरेश जोशी ही अगदी सहृदयी आणि भावनिक व्यक्तिमत्त्व. नेहमीच समाजकल्यात अग्रेसर भूमिका बजावताना दिसून येत आहेत. आज रोजी माधवी ताई जोशी अणि नरेश जोशी यांनी कुंभे वाडी आणि आंबवली वाडी येथे जाऊन प्रत्येक महिलेला साडी, पुरुषांना शर्ट पीस आणि पँट पीस, लहानग्यांना मनसोक्त फराळ देत प्रत्येकाची दिवाळी गोड करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. नक्कीच या छोट्याशा प्रयत्नातून गरिबांची दिवाळी मनमुराद आनंदात साजरी होईल. प्रत्येकाला दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा देत अत्यंत उत्साहात हा सण साजरा करत आहोत..