पत्रकाराच्या नावाने व्यापारी महासंघाच्या अध्यक्षाची व्यापारी वर्गाकडुन सक्तिने वसुली महागांव 

किशोर राऊत 

तालुका प्रतिनिधी,  महागांव

शहरात व्यापारी महासंघ स्थापन करण्यात आला असुन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष वृत्तपत्रामध्ये जाहिरित देण्यासाठी व्यापारी वर्गाकडून दहा ते पंधरा हजार रुपये वसूल करीत आहेत हा प्रकार गेल्या कित्येक वर्षापासुन व्यापारी वर्गाकडून वसुल केलेले पैसे बोटावर मोजण्याइतक्या वृत्तपत्रांना जाहिरात देऊन बाकी पैसे कुठे जातात याची शहानिशा करण्यासाठी एकही व्यापारी पुढे येत नसल्याने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मात्र असले प्रकार बऱ्याच वर्षापासून करीत आहेत व्यापारी वर्गांना जाहिरात मागितली तर व्यापारी अध्यक्ष्याकडे पैसे जमा केले असे सांगत आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्गांकडून पैसे जमा करुनही बहूतांश पत्रकारांना आपल्या नावावर वसूली होत असल्याची तसूभरही माहिती नाही व्यापारी वर्गांकडून वसूल केलेले पैसे कुठे जातात याचा पत्रकारांसह व्यापारी वर्गाने शोध घेणे गरजेचे आहे व्यापारी महासंघाचा अध्यक्ष एका स्वयमघोषित संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगितले जाते व्यापारी वर्गाचे पैसे मात्र स्वतःच्या संघटनेकडे वळते केल्याचे सांगितले जाते.

बहुतांश पत्रकारांना जाहिरात देत नसल्याने पत्रकारामध्ये संतापासह नाराजी पसरली आहे पत्रकाराच्या नावाने पैसे जमा करणे व त्याच पैश्यांचा उपयोग स्वयमघोषित संघटनेच्या कामासाठी किंवा वयक्तिक कामासाठी खर्च करणे ही चांगली गोष्ट नसून पत्रकाराच्या नावाने जमा केलेला पैसा दरडोई पत्रकारावरच खर्च करायला पाहिजे असा पत्रकारामध्ये सूर उमटत आहे गेल्या कित्येक वर्षापासून अध्यक्ष व्यापारी वर्गांकडून पैसे जमा करतो त्याचा हिशोब सुद्धा व्यापारी व पत्रकारांना न देता पैसे कोणाला दिल्या जातात याची माहितीसुध्दा दिल्या जात नसल्याने पत्रकाराच्या नावावर जमा करण्याची खेळी अंगलट येऊ‌ शकते पत्रकार हा समाजाचा स्वच्छ आरसा असुन त्यांना जाहिरातीच्या माध्यमातुन मदत करणे हे समाजहिताच्या व जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे पत्रकार आपला जीव धोक्यात घालून समाजातील सर्वच संकटग्रस्तांना व अन्यायग्रस्तांना आपल्या लेखणिमधुन वाचा फोडत असतो परंतु येथिल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पत्रकाराच्या नावाने वसूली करतात आणि मोजक्याच पत्रकारांना जाहिरात देत असल्यामुळे अध्यक्षाची हि पद्धत भेदभावपुर्ण असुन पत्रकाराच्या नावावर जाहिरातीच्या रुपात व्यापारी वर्गाकडून वसूल केलेल पैसे प्रत्येक पत्रकाराच्या वृत्तपत्राला देणे बंधनकारक आहे केवळ दोन चार वृत्तपत्रांनाच जाहिरात देत असेल तर पत्रकारांसाठी हा प्रकार कमी लेखण्याचा आहे त्यामुळे बहुतांश पत्रकारांना जाहिरात दिली जात नाही याउलट उद्धट शब्दात बोलुन पत्रकाराची मुस्काटदाबी अध्यक्षाकडुन होत असेल तर अशा पध्दती विरोधात वंचित पत्रकारांनी एकसंघ राहिले पाहिजे व्यापारी वर्गाकडून दोन चार पत्रकाराच्या नावाने वसुली केली जात नाही तर पत्रकार संघाच्या नावावर वसूली केली जाते सदर वसुल केलेले पैसे सर्वच पत्रकारांना समान वाटेकरी म्हणुन जाहिरातीच्या रुपात दिले पाहिजेत.

वास्तविक पाहता किराणा दुकानात वजनमापे सदोष असणे दुकानात भावफलक नसणे त्याचप्रमाणे भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणे भेसळयुक्त पदार्थांवर जादा दर आकारणे त्याचप्रमाणे ग्राहकांना पक्के बिल न देणे अशा प्रकारचे अक्षम्य व गंभीर प्रकार किराणा दुकानात होत असतांनासुध्दा याची गंभीर दख्खल घेणे आवश्यक आहे असल्या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी धडककृती कार्यक्रम राबवून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी ग्राहकांकडुन होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here