बल्लारपूर विधानसभेत डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे पारडे जड

बल्लारपूर विधानसभेत डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे पारडे जड

बल्लारपूर विधानसभेत डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे पारडे जड

🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर
📱 8830857351

चंद्रपूर/ बल्लारपूर : 13 नोव्हेंबर
गेल्या वर्ष-दोन वर्षापासून सतत जनतेत संवाद साधला जात आहे. त्यामुळे सार्‍याच समाजाचा उदंड प्रतिसाद बल्लारपूर विधानसभेच्या अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांना मिळत आहे. त्यांच्या उमेदवारीने काँग्रेस व भाजप उमेदवारांनी काही अंशी हाय खाल्ल्याचे चित्र या मतदार संघात बघायला मिळत आहे.
डॉ. गावतुरे यांचे पारडे जड झाल्यानेच त्यांच्या बॅनरवर शेणफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे गावतूरे यांचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. कार्यकर्त्यांनी बॅनर खाली उतरवला आणि बॅनरची साफसफाई केली. गावतुरे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची उमेदवारी पक्की मानली जात होती. त्यांचा विजयाचे दावे देखील केले जात होते. मात्र, काँग्रेसनं तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली. अपक्ष उमेदवार असताना त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बल्लारपूर मतदारसंघात तिहेरी लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, बॅनरवर शेणफेक झाल्याच्या प्रकारामुळे चंद्रपूरच्या राजकाराणाची पातळी घसरल्याची चर्चा आता रंगली आहे.
धान कापणी असल्याने आपल्या रॅलीत गर्दी जमणार नाही, असे वाटले असताना, मागासवर्गीय समाजातील मोठी मंडळी रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. त्यामुळेच गावतुरे यांना स्फुरण चढले, तर काँग्रेससह भाजपच्या तोंडचे पाणी पळाले. पक्षासाठी जिवाचे रान करीत असताना काँग्रेसने डॉ. गावतुरे यांना मधाचे बोट दाखवले होते. पण नंतर दुधातून माशी काढून बाहेर टाकावी इतक्या सहजपणे त्यांना डावलले. त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांना दिली गेली. त्यामुळे डॉ. गावतुरे यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून आपली दावेदारी सादर केली. संसाधनांची कमतरता असतानाही अवघ्या आठवड्याभरात त्यांनी त्यांची उपद्रव क्षमताही सिध्द केली. त्यामुळे काँग्रेस व भाजप उमेदवारानेही सध्या धास्ती घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here