धक्कादायक 💥 चंद्रपूर जिल्ह्यात महीला उमेदवाराच्या बॅनर वर शेणफेक

236
धक्कादायक 💥 चंद्रपूर जिल्ह्यात महीला उमेदवाराच्या बॅनर वर शेणफेक

धक्कादायक 💥
चंद्रपूर जिल्ह्यात महीला उमेदवाराच्या बॅनर वर शेणफेक

धक्कादायक 💥 चंद्रपूर जिल्ह्यात महीला उमेदवाराच्या बॅनर वर शेणफेक

📍चंद्रपूरच्या राजकारणाची पातळी घसरली

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 13 नोव्हेंबर
बल्लारपूर मतदार संघातून डॉ. अभिलाषा गावतुरे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.
एक महिला कणखर नेतृत्व म्हणून त्या पुढे येत आहेत.
त्यांच्या प्रचाराच्या बॅनरवर शेणफेक करण्यात आली आहे.
डॉ. गावतुरे यांचे पारडे जड झाल्यानेच त्यांच्या बॅनरवर शेणफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे गावतूरे यांचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. कार्यकर्त्यांनी बॅनर खाली उतरवला आणि बॅनरची साफसफाई केली. गावतुरे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची उमेदवारी पक्की मानली जात होती. त्यांचा विजयाचे दावे देखील केले जात होते. मात्र, काँग्रेसनं तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली. अपक्ष उमेदवार असताना त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बल्लारपूर मतदारसंघात तिहेरी लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, बॅनरवर शेणफेक झाल्याच्या प्रकारामुळे चंद्रपूरच्या राजकारणाची पातळी घसरल्याची चर्चा आता रंगली आहे.