अलिबाग मतदार संघात ७२ वर्षात शेकापचे वर्चस्व

अलिबाग मतदार संघात ७२ वर्षात शेकापचे वर्चस्व

अलिबाग मतदार संघात ७२ वर्षात शेकापचे वर्चस्व
१५ निवडणुकीत १० वेळा शेकाप आमदार ,४वेळा काँग्रेस,शिवसेना १
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग : राज्याच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रायगडचे राजकारण नेहमी चर्चेत राहिलेले आहे. कारण येथे अलिबाग, पेण ,पनवेल या पट्ट्यात शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व अबाधित ठेवले होते. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या आतापर्यंत झालेल्या एकूण निवडणुका कडे पाहिले तर ७२ वर्षात झालेल्या १५ निवडणुकांमध्ये शेकापचे दहा आमदार विजयी झालेले आहेत. चार निवडणुकात काँग्रेसला विजय मिळवता आला आहे.
१९५२ साली झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या द. का. कुंटे यांनी विजयी संपादित केला होता. त्यावेळी त्यांना १८,४२६ मते मिळाली तर शेकापच्या ना.ना पाटील यांना १२,५०२ मते मिळाली होती. त्यानंतर सन १९५७ मध्ये दत्ता पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फ निवडणूक लढवून पहिल्यांदा विधानसभेत पाऊल टाकले.१९६२ मध्ये काँग्रेसच्या दत्ता खानविलकर यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार दत्ता पाटील यांना पराभूत केले. दत्ता पाटील यांनी १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या दत्ता खानविलकर यांना पराभूत केले. तर १९७२ मध्ये काँग्रेसचे ना.का. भगत यांना उमेदवारी देत निवडून आले.१९७८ ते १९९९ या २१ वर्ष झालेल्या पाचही निवडणुकीत शेकाप ने अलिबागवरील आपले प्रभुत्व अखंडीत ठेवले. यामध्ये दत्ता पाटील हे १९७८,१९८०,१९८५,१९९० असे चार वेळा अलिबागचे आमदार झाले. या काळात त्यांनी राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदही भूषविले होते. सन १९९५ मध्ये दत्ता पाटील यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती स्वीकारली. त्याऐवजी शेकापने मीनाक्षी पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांनीही पहिल्याच निवडणुकीत दणदणीत विजय संपादित करण्यात अलिबागच्याच नव्हे तर रायगड मधील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान पटकावला. मीनाक्षी पाटील यांनी १९९९ मध्ये ही सलग विजय संपादित केले. या काळात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख सरकारात त्या काही काळ राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.सन २००४ मध्ये मात्र काँग्रेसच्या मधु ठाकूर कडून त्यांना पराभूत व्हावे लागले. सन २००९ मध्ये मतदार संघाची पुनर्रचना करण्यात आली. अलिबाग मतदार संघात उरण तालुक्याचा भाग वगळून नव्याने मुरुड तालुक्याचा समावेश करण्यात आला. यावेळी शेकापने मीनाक्षी पाटील यांना पुन्हा उमेदवारी देत निवडून आणले. सन २०१४ मध्ये शेकापचेच पंडित पाटील या मतदारसंघाचे आमदार झाले. सन २०१९ मध्ये मात्र त्यांना शिवसेनेच्या महिंद्र दळवींनी पराभूत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here