अंध महिलांच्या क्रिकेटला इंडसइंड बँकेचे पाठबळ – भारताच्या टी-२० महिला विश्वचषक संघाला पाठिंबा

138

अंध महिलांच्या क्रिकेटला इंडसइंड बँकेचे पाठबळ – भारताच्या टी-२० महिला विश्वचषक संघाला पाठिंबा

कृष्णा गायकवाड 

तालुका प्रतिनिधी 

पनवेल: भारतीय क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक क्षण आलेला आहे. जगातील पहिल्यावहिल्या महिला अंध टी-२० विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतीय अंध महिला क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्डची क्रिकेट शाखा आणि उपक्रम असलेल्या क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाच्या सहकार्याने इंडसइंड बँक त्यांच्या सीएसआर उपक्रमाद्वारे भारतीय संघाला पाठिंबा देते. विविधता, सर्वसमावेशकता आणि खेळाच्या परिवर्तनीय शक्तीसाठी बँकेची अढळ वचनबद्धता हे सहकार्य अधोरेखित करते. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि अमेरिका या सात देशांचा समावेश असेल. नवी दिल्ली, बेंगळुरू आणि कोलंबो येथे हे सामने होणार आहेत.

बँकेच्या सहकार्याबद्दल इंडसइंड बँकेचे कॉर्पोरेट, कमर्शियल आणि ग्रामीण बँकिंग प्रमुख संजीव आनंद म्हणाले की, अंधांसाठीच्या जगातील पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी करत असलेल्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाला पाठिंबा देण्याचा आम्हाला अभिमान आहे. इंडसइंड बँकेत आम्ही सर्वसामावेशकतेला सर्वाधिक महत्त्व देतो. ते आमचे एक व्यावसायिक मूल्य आहे. सीएबीआयसोबतची आमची दीर्घकालीन भागीदारी ही समान संधी निर्माण करण्याची आणि अडथळ्यांच्या पलीकडे जाऊन कौशल्याचा उत्सव साजरा करण्याची आमची वचनबद्धता दर्शवते. हे खेळाडू त्यांचे कौशल्य आणि दृढनिश्चयाने आम्हाला प्रेरणा देतात. तसेच जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्यासोबत उभे राहण्याचा आम्हाला सन्मान वाटतो.”

या भागीदारी बद्दल क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाच्याचे अध्यक्ष डॉ. महांतेश जी. किवदासन्नावर म्हणाले की, “सीएबीआय आणि संपूर्ण देशासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. हा टप्पा गाठण्यासाठी आमच्या महिला संघाने अतुलनीय धैर्य, चिकाटी आणि उत्कृष्टतेचे उदाहरण दिले आहे. त्यांच्या कामगिरीतून दिव्यांगांच्या क्रिकेटची वाढती ताकद आणि सर्वसमावेशकता दिसून येते. दृष्टिहीन खेळाडूंना सक्षम बनवण्याच्या आमच्या ध्येयाला भक्कम पाठबळ देण्यासाठी आम्ही इंडसइंड बँकेचे मनापासून आभारी आहोत. या गुणी महिलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात आणि खेळाच्या माध्यमातून देशाला सन्मान मिळवून देण्याचा त्यांचा उदात्त हेतू पूर्ण करण्यात बँकेच्या सहकार्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अंध महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघ

काव्या एन.आर, जमुना रानी तुडू, करूणा कुमारी, गंगा कदम, काव्या व्ही, पार्वती मार्नदी, फुला सारेन, सिमरनजीत कौर, सिमू दास, सुनीता सारथे, अनेखा देवी, सुषमा पटेल, अनु कुमारी, बसंती हंसदा, दुर्गा येवले, दीपिका टी.सी.