हिंगणघाट शिवसेना शाखेच्या वतीने दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

हिंगणघाट:- दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात भाजपचे रावसाहेब दानवे हे खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शनिवारी कारंजा चौक चौकात त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी दानवेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल, डिझेल दरवाढीसह महागाईच्या विरोधातही केंद्रशासनाचा निषेध करण्यात आला.

दिल्लीतील अन्नदात्यांच्या आंदोलनाचा अवमान करणे, खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचे पाप त्यांनी केले. भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी सर्व देशवासीयांना अनेक मोठी स्वप्ने दाखवली. प्रत्यक्षात सत्तेवर येताच प्रत्येक क्षेत्रात महागाईचा आलेख वाढतच गेला आहे. डिझेल, पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यांची झळ सामान्य नागरिकांना बसत आहे.

भाजपानेते तथा केंद्रीयमंत्री ना.रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आन्दोलनात चीन तसेच पाकिस्तानचा हात असल्याचा दिलेल्या बेजबाबदार वक्तव्य केले आहे हिंगणघाट शिवसेना शाखेच्या वतीने स्थानिक कारंजा चौक येथे शिवसेनानेते तथा माजी आमदार अशोक शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी माजी नगरसेवक राजेंद्र खुपसरे,शहर अध्यक्ष सतीश ढोमणे,डॉ.आदर्श गुजर,श्रीधर कोटकर,बालू अनासाने,शंकर मोहमारे,प्रकाश घोड़े,संजय पिम्पलकर इत्यादि कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करीत पेट्रोल,डीजल,गॅस दरवाढिचा निषेध केला.यावेळी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत श्री दानवे यांचे प्रतिमेचे दहन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here