यशस्वी परिक्षाथीँचा प्रमाणपत्र आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

गुणवंत कांबळे मुंबई प्रतिनिधी
म.नं.९८६९८६०५३०
बुद्ध धम्म प्रचार समिती (रजि) TRAINING INSTITUTE OF SKILLS DEVELOPMENT
भांडुप केंद्र आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित रविवार, दि. १२ डिसेंबर २०२१ सकाळी ११:००वा. भांडुप येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. आयु. सुरेश घोडगे यांनी धम्मज्ञान परिक्षेवर सुंदर अशी कविता सादर केली. *भांडुप मधून च नाही तर महाराष्ट्र राज्यातून अनमोल विक्रम जाधव याने ज्युनिअर गटातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल अनमोल जाधव यांना प्रमाणपत्र, पारितोषिक आणि ₹२०००/- चा धनादेश(चेक) सुपूर्त करण्यात आला. तसेच द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या परिक्षर्थींना पारितोषिक, प्रमाणपत्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “जातिव्यवस्थेचे निर्मूलन” हे पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.*
तदनंतर यशस्वी परीक्षार्थींनी आपला अनुभव सांगत, आयोजकांचे आभार व्यक्त केले आणि पुढच्या वर्षी त्यांच्या विभागात ही परीक्षा आयोजित करण्याचा मानस दाखवला. कार्यक्रमाच्या शेवटी भांडुप केंद्र प्रमुख आयु. संतोष खोडके यांनी *धम्मज्ञान परीक्षा* उपक्रम राबविण्याचा *हेतू, उद्देश बाबत भूमिका मांडली.* आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे महत्व पटवून दिले.*सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी TISD च्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काम करण्याऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
शेवटी अरुणा सावंत आई सदर कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करुन सर्वांसाठी चहा आणि नाश्ता अल्पोहार दिला त्याबद्दल त्यांचे TISD वतीने आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
विजेत्या परिक्षार्थींची नावे :
ज्युनिअर ग्रुप
प्रथम क्रमांक : अनमोल जाधव
(महाराष्ट्र राज्य)
द्वितीय क्रमांक : उमेश कोकणे
तृतीय क्रमांक : सम्यक कोकणे
सिनिअर ग्रुप :
प्रथम क्रमांक : शितल सातदिवे
द्वितीय क्रमांक : मोतीराम कदम
तृतीय क्रमांक : विशाल कांबळे
तृतीय क्रमांक : प्रथमेश पाके
तृतीय क्रमांक : सरस्वती सकपाळ
तृतीय क्रमांक : योगेश गवई
तृतीय क्रमांक : नितीन कांबळे