आम्ही शिवसेनेसोबत युती करायला तयार आहोत; परंतु… – अॅड. प्रकाश आंबेडकर

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग या राजकीय पक्षांसोबत निवडणूक लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच तीनही पक्ष मिळून जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत जागा वाटप करणार असल्याचे देखील आंबेडकरांनी सांगितले.प्रकाश आंबेडकरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. आंबेडकर पुढे म्हणाले, ‘ आम्ही मुंबईच्या पातळीवर एक पर्याय उभा करत आहोत. तसेच आम्ही काँग्रेससोबत देखील युती करायला तयार आहे. आम्ही त्यांना हरलेल्या जागा मागत आहोत. मात्र, भविष्याच्या राजकाराणाच्या भीतीने काँग्रेस द्यायला तयार नाही.’
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आम्ही एमआयएमसोबत महापालिका निवडणकीत युती करणार नाही. तसेच आम्ही निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करायला तयार आहोत, परंतु ते आमच्या सोबत येतील का हा प्रश्न आहे.’