न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण – नरेंद्र पिपरे.

53

न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण – नरेंद्र पिपरे.

न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण - नरेंद्र पिपरे.
न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण – नरेंद्र पिपरे.

देवेंद्र सिरसाट.
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
9822917104

एक नोव्हेंबर २००५पुर्वी नियुक्त प्राचार्य ,मुख्याध्यापक ,प्राद्यापक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जूनी पेन्शन लागू करावी.या एकमेव व अतिशय महत्त्वाच्या मागणीसाठी १०व ११ डिसेंबरला संविधान’ चौकात उपोषण केले.१२तारखेला १२कर्मचार्यांनी मुंडण केले.तरीसुद्धा येत्या हिवाळी अधिवेशनात न्याय मिळाला नाहीतर आमरण उपोषण करणार असा इशारा १नोव्हेंबर२००५ पूर्वी नियुक्त जूनी पेंशन कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र पिपरे यांनी दिला.उपोषण व मुंडन आंदोलनाला आमदार नागो गाणार ,पदवीधर आमदार अॕड. अभिजित वंजारी,अल्पसंख्यांक आयोग व जातीजमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर,नागपूर डिस्ट्रिक्ट शाळा कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विनायक इंगळे ,म.मा.शिक्षक महासंघाचे महासचिव बाळा आगलावे,काँग्रेस-शिक्षक-सेल अध्यक्ष संजय धरममाळी ,म.रा.जूनी पेंशन हक्क संघटनेचे विभागीय अध्यक्ष यशवंत कातरे ,सल्लागार तेजराम बांगडकर व काँग्रेस मुख्याध्यापक शिक्षक सेलचे विभागीय अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी उपोषण आंदोलनाला भेट देऊन चर्चा केली.तसेच येत्या अधिवेशनात लक्षवेधी लावणार असल्याचे आमदार वंजारी म्हणाले.१९८२च्या जुन्या पेंशन योजनेसाठी १नोव्हेंबर२००५ पूर्वी नियुक्त परंतु नंतर १००टक्के अनुदानप्राप्त पेंशनग्रस्त प्राचार्य ,मुख्याध्यापक ,प्राद्यापक ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना त्यांच्या हक्काची पेंशन मिळावी म्हणुन माध्यमिक शिक्षक पेंशन कृती समितीने दोन दिवस उपोषण व १२डिसेंबरला मुंडन आंदोलन केले.१नोव्हेंबर२००५ पूर्वी नियुक्त नागपूर जिल्हा माध्यमिक व प्राथमिक जूनी पेंशन कृती समितीचे मार्गदर्शक रविंंद्र हिवरकर,मोरेश्वर अढाऊ,अध्यक्ष नरेंद्र पिपरे,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गलांडे,सचिव नरेंद्र फाले,उपाध्यक्षा श्रीमती अंजुषा बोधनकर ,उपाध्यक्ष रविंंद्र वाट,पुरुषोत्तम श्रीराव,पंढरी कडु,महासचिव सुनिल कोल्हे , रामकृष्ण ठाकरे ,सहसचिव देविदास इटनकर ,राजेश गजभीये ,रमेश मेश्राम ,डाॕ.प्रतिभा टापरे,कोषाध्यक्ष नरेश शहारे तसेच प्रदिप हुडे,धर्मराज पाटील,देवेंद्र खराटे,बंडु भगत,राकेश उमरेडकर,छगन चरडे,विनोद लच्छोरे ,देविदास शंभरकर ,शिवकुमार मोहोड,दिलीप तराळेकर,राजु शिवनकर ,शैला किरपान,चंद्रशेखर रेवतकर ,अनिल बारंगे,बाळकृष्ण पिलारे ,सुरेश बोबडे ,ज्ञानेश दळवी व चंदु खांबलकर यांनी केले आहे.