माणगाव येथे शिवसेना व युवासेना दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकारी मेळावा उत्साहात संपन्न, आमदार भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती

✍️सचिन पवार ✍️

कोकण ब्युरो चीफ

📞8080092301📞

रायगड :-कुंणबी भवन माणगाव येथे शिवसेना युवासेना व महिला आघाडी दक्षिण रायगड पदाधिकाऱ्यांचा भव्य मिळावा आयोजित करण्यात आला होता, महाड पोलादपूर माणगाव चे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित पदाधिकारी मिळावा मध्ये महाड मतदार संघातील महाड माणगाव व पोलादपूर तीनही तालुक्यात शिवसेना पक्षाने केलेल्या विकासकामांचा आढावा घेत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नवीन मतदार नोंदणी, नगरपंचायत, पंचायत समिती ग्रामपंचायत येथील मतदान वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले व दक्षिण रायगड जिल्ह्यातील तळा, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यांचा ही आढावा घेण्यात आला. तसेच प्रत्येक गांव, वाडी येथे शिवसेना पक्ष अजून बळकट व वाढीसाठी होत असलेल्या कार्याचा संदर्भात आढावा घेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पदाधिकारी मेळाव्यात आमदार गोगावले पदाधिकाऱ्यांना संबोधित करत म्हणाले महाड मतदार संघातील एकूण सव्वा दोनशे ग्रामपंचायत पैकी शिवसेना पक्षाकडे जवळपास १६० ग्रामपंचायत आहेत त्याचे कारण शिवसेना पक्षाने केलेली व सतत करत असलेली विकास कामे आहेत, आपण जनतेच्या विकासासाठी कमी पडत नाही त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तळागाळातील मतदारांची मतदार यादीत नोंद करणे व प्रामाणिकपने पक्षाच्या वाढीसाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. पुढे आपल्या भाषणात आमदार गोगावले यांच्याकडून राष्ट्रवादी पक्षाला युतीचा धर्म पाळण्याचा आव्हानात्मक इशारा ही देण्यात आला.

शिवसेना, युवासेना व महिला आघाडी दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकारी मिळावा ला आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना उपनेते शिल्पा ताई देशमुख, शिवसेना रायगड लोकसभा निरीक्षक मंगेश सातमकर यांच्याकडून प्रमुख मार्गदर्शकांसह, जिल्हा प्रमुख, जिल्हा संघटक व युवा जिल्हाप्रमुख व इतर जेष्ठ पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या वेळी पदाधिकारी मेळावा साठी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या सह शिवसेना उपनेते व रायगड जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख शिल्पा ताई देशमुख, शिवसेना रायगड लोकसभा निरीक्षक मंगेश सातमकर, दक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवा जिल्हाप्रमुख विपुल उभारे, निलीमा घोसाळकर, राजीव साबळे तसेच महाड मतदार संघातील व दक्षिण रायगड जिल्ह्यातील अनेक शिवसेना, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here