महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन आणि कचरा वाहतूक श्रमिक संघ यांच्यामार्फत आयोजित स्पर्धेमध्ये कामगारांचा उस्फुर्त सहभाग
मनोज कांबळे
मुंबई: महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन आणि कचरा वाहतूक श्रमिक संघ यांच्या वतीने लाल बावटा चषक 2025 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वडाळ्यातील अजमेरा गार्डन मैदानावर करण्यात आले आहे. ही स्पर्धा 13 आणि 14 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडणार असून विविध कामगार संघटनांच्या संघांचा सहभाग अपेक्षित आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन आणि प्रमुख उपस्थितीत मा. श्री खुडे (उपमुख्य अभियंता, घ.क. व्य) मार्गदर्शन करणार आहेत. आयोजन समितीने सांगितले की कामगारांमध्ये क्रीडा भावना वाढवणे, आरोग्य जपणे आणि परस्परांतील सलोखा दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असेल.
मैदानावर सर्व सोयीसुविधांसह स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून दोन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेचे संचालन आणि यशस्वी पार पाडण्याची जबाबदारी आयोजन समिती पार पाडत आहे.









