अपघातात दोन ठार, दोन जखमी
तेजपाल जैन
कोलाड प्रतिनिधी
मो: 8928847695
मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरील पुई गावाच्या हद्दीत पुई स्टॉप जवळ कारची कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक या अपघातात दोघे जन ठार तर दोघे जन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शनिवार दि. १३/१२/२०२५ रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादिच्या ताब्यातील कंटेनर क्र.एम. एच.११ डी. डी.०४२५ हा मुंबई-गोवा हायवे रोडने स्वतः चालवीत घेऊन मुंबई कडून कोलाड बाजुकडे येत असतांना मौजे पुई गावाच्या हद्दीत पुई बस स्टॉप जवळ आला असता पाठीमागून मुंबई-बाजूकडून कोलाड बाजुकडे जाणारी कार क्र. एम. एच. ४६ सि. यु. ८४५३ या गाडीवरील चालक हुसबान अब्दुल हमीद कारविनकर वय २० वर्षे रा. आंबेत ता. म्हसळा जि. रायगड यांने आपल्या ताब्यातील कार रस्त्याच्या परिस्थितीचा दुर्लक्ष करून वाहतूक नियमांचे उलंघन करून अतिवेगाने वाहन चालवून फिर्यादीच्या ताब्यातील कंटेनरला जोरदार ठोकर मारून हा अपघात झाला.
या अपघातात ओवेस सज्जाद सरखोत रा.वणी पो.पुरार ता. माणगांव जि. रायगड व सज्जाद अब्दुल सखुर सरखोत रा. वणी पो. पुरार ता. माणगांव जि. रायगड हे दोघे जन ठार तर हुसबान अब्दुल हमीद कारविनकर रा. आंबेत ता. म्हसळा जि. रायगड व सरजित सज्जाद सरखोत रा. वणी पो.पुरार ता. माणगांव जि. रायगड हे दोघे जन जखमी झाले असुन या अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलिस व रेस्क्यू टीम यांनी मोलाचे मदत केली असुन सदर अपघाताची नोंद कोलाड पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन वरिष्ठाच्या आदेशाने पुढील तपास पोसई महाडिक कोलाड करीत आहेत.









