कामोठे सेक्टर २१ परिसरातील झालेली दुर्दशा; शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या हस्तक्षेपाने परिसर झाला स्वच्छ
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
पनवेल : कामोठे वसाहतीमधील सेक्टर २१ परिसरातील झालेली दुर्दशा शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या लक्षात येताच त्यांनी तो परिसर स्वच्छ करून दिल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत .
येथील सत्याम हाइट्स आणि महाकाली निवास सोसायटीच्या परिसरात अनेक वर्षांपासून रिकामे पडलेल्या एमएसबी प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, झुडपे आणि रानगवत वाढल्यामुळे सापांचा उपद्रव प्रचंड वाढला होता. रहिवाशांनी हा गंभीर प्रश्न शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्याकडे थेट मांडला. या तक्रारीनंतर शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांनी तात्काळ पुढाकार घेत दोन दिवसांत एमएसबी आणि सिडको अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र दोन्ही विभागांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलल्याने कोणतीही अधिकृत कारवाई झाली नाही. त्यावेळी गौरव पोरवाल यांनी स्वतःच्या खर्चातून संपूर्ण प्लॉटची स्वच्छता करून घेतली, ज्यामुळे कचरा, झुडपे तसेच सापांचे संभाव्य ठिकाण असलेली सर्व घाण दूर करण्यात आली आणि संपूर्ण परिसर पुन्हा सुरक्षित बनला. स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या या तत्पर आणि जबाबदार कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.









