पनवेल तालुका पोलिसांनी केले जनजागृतीसाठी मोटर सायकल रॅलीचे आयोजन 

34

पनवेल तालुका पोलिसांनी केले जनजागृतीसाठी मोटर सायकल रॅलीचे आयोजन

संजय कदम

पनवेल : पनवेल तालुका पोलिसांनी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हद्दीमध्ये मोटर सायकल रॅलीचे आयोजन केले होते .

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनखाली पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील केळवणे जे टी ते केळवणे गाव, बस स्टॉप, शाळा येथे मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .सदर मोटर सायकल रॅलीमध्ये कोस्टल सेक्युरिटी हेल्पलाइन नंबर 1093 चे बॅनर व पोस्टर ने जनजागृती करण्यात आलेले आहे. तसेच उपस्थित सागर रक्षक व नागरिक यांना सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना देण्यात आल्या . तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कासारभट, केळवणे येथे पोलिसांच्या पथकाने भेटी देऊन सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले .