अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या अटकेनंतर बडे खुलासे, नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार?

 

मुंबई अमली पदार्थ विक्री व दलालीमध्ये नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर छापा टाकला आहे. ड्रग्स प्रकरणात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना काल अटक करण्यात आले होते. तब्बल 10 तासांच्या चौकशीनंतर खान यांनी एनसीबीकडून अटक करण्यात आले होते. आज त्यांच्या घरावर एनसीबीने धाड टाकली आहे.

दयानंद सावंत

मुंबई :- ड्रग्ज तस्करीप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. करण सजनानीच्या ड्रग्ज कार्टेलमध्ये समीर खान यांनी पैसे गुंतविल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले आहे. तसेच, सजनानीतर्फे चालवल्या जात असलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये समीर खान अ‌ॅक्टिव्ह पार्टनर असल्याचेही सांगितले जात आहे. एनसीबीने केलेल्या तपासात ही माहिती समोर आल्यामुळे नवाब मलिक अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एनसीबीने मुंबईच्या वांद्रे पश्चिम इथल्या एका कुरिअरकडून गांजा ताब्यात घेतला होता. यानंतर पुढच्या कारवाईमध्ये खार इथल्या करण सजनानी यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला. त्यामुळे करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, शाइस्ता फर्निचरवाला आणि राम कुमार तिवारी यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केलं गेलं. यावेळीच तपासादरम्यान वांद्रे इथल्या रहिवासी समीर खानचं नाव समोर आलं. समीर खान हे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचे जावई आहेत. त्यांना नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. त्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. समीर खान यांचा ड्रग्ज रॅकेटमध्ये मोठा सहभाग असल्याचा आरोप होतोय. करण सजनानीच्या ड्रग्ज कार्टेलमध्ये समीर खान यांनी पैसे गुंतवले असून सजनानी चालवित असलेल्या ड्रग्ज रॅकेटमद्ये समीर खान हे अ‌ॅक्टिव्ह पार्टनर असल्याचेही सांगितले जात आहे.

समीर खान रडारवर का?

समीर खान हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. ड्रग्ज प्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पेद्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी करण सजनानी याला 20 हजार रुपये गुगल पेद्वारे पैसे पाठवल्याचा आरोप आहे.

कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसतो : नवाब मलिक

जावई समीर खानला अटक झाल्यानंतर अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. “कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास आहे,” असे नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, एनसीबी या प्रकरणावर तपास करत असून आगामी काळात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here