हिंगणघाट तालुक्यात आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ.

देशात वाढत असलेल्या बर्ड फ्ल्यू मुळे लोकांत भीतीच वातावरण. मृत मोरांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले.


मुकेश चौधरी प्रतीनिधी
हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव-दातार येथील परीसरात बुधवारी दुपारच्या सुमारास आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आणी कर्मचारी घटनास्थळ दाखल झाले. पंचनामा करुन मृत मोरांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.

पुणे लॉबचा अहवाल आल्यावरच मोरांचा मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होईल. बोरगाव-दातार येथील परीसरातील नाल्याच्या बाजूला हे आठ मोर मृतावस्थेत आढळून आले आहेत. यामध्ये एक नर तर सात मादी असल्याचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या देशात आणी राज्यात बर्ड फ्ल्यूची जीव घेण्या रोगाची साथ सुरू आहे. अशात हिंगणघाट तालूक्यात आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बर्ड फ्लू आज मोठ्या प्रमाणांत पसरत आहे. आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूने दाखल झाला आहे. राज्यात परभणी, मुंबई, अमरावती जिल्हात मोठ्या प्रमाणात पक्षी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील राज्य सरकार आवश्यक सर्व खबरदारी आणी उपायोजना करीत आहे.

देशात बर्ड फ्लुचा वाढता आलेख.
महाराष्ट्रासह आतापर्यंत 8 राज्यांनी बर्ड फ्लूची पुष्टी केली आहे. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामूळे शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here