नविन विद्यापीठ कायद्याच्या निषेधार्थ भाजयुमोने अहेरी विधानसभा क्षेत्रातून मुख्यमंत्र्यांना पाठविली 501 पोस्टकार्ड..!!

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी ग्रामीण मो.न.9405720593

एटापल्ली : – राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात घाईघाईने नवीन विद्यापीठ कायदा मंजूर करून सर्व अधिकार आपल्याकडे घेतले आहे, विद्यापीठाला वसुलीचा अड्डा बनविण्याचा कथित डाव राज्य सरकारने आखला आहे, ह्याचे निषेधार्थ भाजपा युवा मोर्चा अहेरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना नवीन विद्यापीठ कायदा त्वरित मागे घ्यावा, तसेच महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करणारे मजकुर लिहलेले 501 पत्रे (पोस्टकार्ड) अहेरी विधानसभा क्षेत्राच्या विविध पोस्ट ऑफिस मधून काल पाठविण्यात आले.
ह्यावेळी भाजयुमो प्रदेश सचिव अनिलभाऊ डोंगरे,प्रदेश उपाध्यक्ष अमितभाऊ गुंडावार, भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुका महामंत्री मुकेश नामेवार, भाजयुमो अहेरी तालुका अध्यक्ष गुड्डू ठाकरे, तालुका महामंत्री सचिन एरोजवार,अहेरी शहर अध्यक्ष सूचित कोडेलवार सह मोठ्या संख्येने भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here