नागभीड येथे शिवसेनेतर्फे भव्य मकर संक्रांत मेळावा तसेच पक्ष प्रवेश संपन्न

53

नागभीड येथे शिवसेनेतर्फे भव्य मकर संक्रांत मेळावा तसेच पक्ष प्रवेश संपन्न

नागभीड येथे शिवसेनेतर्फे भव्य मकर संक्रांत मेळावा तसेच पक्ष प्रवेश संपन्न

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*

नागभिड : -शिवसेना तालुका च्या वतीने आज दिनांक १४/०१/२०२२ रोज शुक्रवारला, हिंदू हृदय सम्राट, शिवसेनेचे संस्थापक मा. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने व मान.पक्ष प्रमुख व लाडके मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे, युवासेना प्रमुख, पर्यटनमंत्री मा. आदित्य साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जीवतोडे, उप-जिल्हा प्रमुख मा. प्रा. अमृतभाऊ नखाते, तालुका प्रमुख मा. भोजराजभाऊ ज्ञानबोनवार यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत पिसे, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. सरोजताई खापरे, उप-तालुका प्रमुख मनोज लडके, उप-शहर प्रमुख नंदू खापर्डे, राजेश तेजेकर यांच्या नेतृत्वात शिवसेना नागभीड कार्यालय येथे महिलांचे हळदी कुंकू, वाण वाटप तसेच अल्पोपहाराचा कार्यक्रमआणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाला शहरातील शेकडों महिलांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत पिसे, मार्गदर्शन सौ. सरोजताई खापरे, सौ. भारतीताई गजभिये तसेच आभार प्रदर्शन मनोज लडके यांनी केले. तसेच
मकरसंक्रातीच्या पर्वावर, माधुरी मोजनकर, कल्पना कोसरे, अश्विनी कोसरे यांचा पक्षप्रवेश घेण्यात आला.
प्रस्तुत कार्यक्रमाला, महिला शिवसैनिक सौ. उषा वासनिक, संगीता लडके, वैशाली भांदककर,कविता सहारे, सुमन मरघडे, योगिता येरने, सुरेखा येरने, शोभा पिसे शशिकला पिसे,हर्षा कोरडे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, धनराज गणवीर उप-शहर प्रमुख, परवेज साबरी, प्रशिल निमगडे, पंकज कोरडे, मुरली कोसरे, चेतन ढोंगे, सुनील राऊत, खुशाल माटे, मयूर वंजारी तसेच शिवसेना तालुका, शहर तसेच महिला आघाडी यांनी मोलाचे सहकार्य केले,