१८ जानेवारीला महाराष्ट्रात मतदानाची सुट्टी
१८ जानेवारीला महाराष्ट्रात मतदानाची सुट्टी

मीडिया वार्ता टीम
१४ जानेवारी २०२२: दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 95 नगरपंचायत, 2 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत प्रत्येकी 7 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सामान्य प्रशासन विभागाने सावर्जनिक सुट्टी जाहीर केली आहे.

राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 95 नगरपंचायतींकरिता तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्‍या आणि सांगली-मिरज-कुपवाड या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकीकरिता ही सावर्जनिक सुट्टी असेल.

मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सावर्जनिक सुट्टी लागू करण्यात आली आहे. खाली नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील हि सुट्टी लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here