चंद्रपुरातून सुरू होणारी ‘क्लायमेट चेंज’ची चळवळ देशव्यापी व्हावी

72
चंद्रपुरातून सुरू होणारी 'क्लायमेट चेंज'ची चळवळ देशव्यापी व्हावी

चंद्रपुरातून सुरू होणारी ‘क्लायमेट चेंज’ची चळवळ देशव्यापी व्हावी

चंद्रपुरातून सुरू होणारी 'क्लायमेट चेंज'ची चळवळ देशव्यापी व्हावी

• आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला मानस

📍16 जानेवारीपासून ’इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 14 जानेवारी
चंद्रपूर येथे तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये पुढील 30 वर्षांच्या पर्यावरणाची बिजे रोवली गेली पाहिजे. तसेच ’क्लायमॅट चेंज’ ही चंद्रपुरातून सुरू होणारी चळवळ देशव्यापी व्हायला हवी. शिवाय या परिषदेचे निष्कर्ष नितीबदलात सहाय्यभूत होतील, अशी अपेक्षा राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
वन अकादमी येथील सिद्धांत सभागृहात पार पडलेल्या पत्रपरिषदेत आ. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी एसएनडी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक डॉ. राजेश इंगोले, डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते.
या कॉन्फरन्सचे उद्घाटन राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे. तर विशेष पाहुणे म्हणून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक राहतील. यावेळी जलपुरुष राजेंद्रसिंह, चाणक्य मंडळ प्रमुख अविनाश धर्माधिकारी, सलील कादेर, अमेरिकेतील हवामान तज्ञ डॉ. नील फिलिप, डॉ. परिमिता सेन, डॉ. दुराई स्वामी, डॉ अमित होरडे, डॉ सुधाकर परदेशी, आयआयटी मुंबईच्या हरिप्रिया यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. प्रोफेसर रुबी ओझा, अतिरिक्त मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्यासह इतर आदी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांनी सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क, अमेरिका यांच्या शैक्षणिक सहकार्याने आणि सोबतच महाराष्ट्र शासनाच्या मँग्रोव्ह फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, इकोलॉजिकल सोसायटी, पुणे आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्या एकत्रित सहकार्याने चंद्रपूर येथे तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- 2025’ चे आयोजन 16 ते 18 जानेवारी या कालावधीत वन अकादमी येथे करण्यात येणार आहे.
पर्यावरणासाठी जेवढ्या संघटना, संस्था काम करतात, त्यांना देशस्तरावर एकत्र आणता येईल का, याचाही विचार या तीन दिवसांत होणार आहे. दिल्लीत मार्च-एप्रिलमध्ये परिषद घेण्याचाही विचार आहे. चंद्रपुरातील क्लायमेट चेंजची ही चळवळ आधी राज्यव्यापी आणि नंतर देशव्यापी करायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. या आंतरराष्ट्रीय परिषदेला पर्यावरणावर प्रेम करणार्‍या पर्यावरण प्रेमींनी व स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
======
प्रभातफेरीने होणार सुरुवात
या परिषदेच्या पहिल्या दिवशी महापालिकेने सकाळी 8.30 ते 9 या वेळात पर्यावरण रॅलीचे आयोजन केले आहे. गांधी चौकातून ही रॅली निघेल आणि प्रियदर्शनी सभागृहापर्यंत जाऊन तेथे रॅलीचा समारोप होईल.