‘नयनबाण’ लागताच प्रियानं बंदूक काढली!
मुंबई:एका मल्ल्याळम गाण्यामुळं ‘नॅशनल क्रश’ ठरलेल्या अभिनेत्री प्रिया वारियारचा एक नवा व्हिडिओ रिलीज झालाय. पहिल्या व्हिडिओत ‘आँखों ही आँखों में इशारा’ करणाऱ्या प्रियाचा ‘आँखियों से गोली मारे’ हा अवतार चाहत्यांसमोर आलाय. तिचा हा अंदाजही नेटिझन्समध्ये व्हायरल झालाय.
काही सेकंदाच्या या नव्या व्हिडिओ क्लिपमध्ये पुन्हा एकदा प्रिया आणि मोहम्मद रोशनमधील केमिस्ट्री खुलून आलीय. शाळेमध्ये वर्गात आपल्या आवडत्या व्यक्तीकडे चोरून पाहणं, त्या व्यक्तीनं आपल्याकडं पाहिल्यावर मनात आनंदाच्या उकळ्या फुटणं या सगळ्या भावना या नवख्या कलाकारांनी अगदी ताकदीनं पडद्यावर साकारल्या आहेत. या व्हिडिओत प्रिया आपल्या बोटांनी बंदूक चालवताना दिसतेय.
‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम चित्रपटातून प्रिया प्रकाश वारियार आणि मोहम्मद रोशन हे दोन्ही कलाकार मल्ल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.