Undo all passengers passing through Wardha area: Eat. Demand of Ramdas Tadas in Lok Sabha
Undo all passengers passing through Wardha area: Eat. Demand of Ramdas Tadas in Lok Sabha

वर्धा परिसरातून जाणार्‍या सर्व पॅसेंजर पूर्ववत करा: खा. रामदास तडस यांची लोकसभेत मागणी

Undo all passengers passing through Wardha area: Eat. Demand of Ramdas Tadas in Lok Sabha
Undo all passengers passing through Wardha area: Eat. Demand of Ramdas Tadas in Lok Sabha

आशीष अंबादे प्रतिनिधी

वर्धा:- कोविड-19 प्रादुर्भावामुळे देशात रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. यामध्ये सुपरफास्ट गाड्यांसह पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. कोविड-19 नंतर देशात बसेस तसेच इतरही सेवा पुर्वपदावर येत आहेत. परंतु, रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी अद्याप खुली झालेली नाही. पॅसेंजर रेल्वेसेवाही अद्याप सुरू झालेली नाही. पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्या अशी मागणी खा. रामदास तडस यांनी लोकसभेतील शुन्य काळात केली.

पॅसेंजर गाड्या हे गरीब प्रवाशांसाठी सोयीच्या असल्याने तसेच नियमित प्रवासासाठीही सर्वाधिक सोईची आहे. या गाड्यांमधून विनाआरक्षित प्रवाशांची संख्या जास्त असली तरी सुरक्षित वापराचे नियम पाळून प्रवासाची अनुमती दिल्यास त्याचा लाभ गरीब प्रवाशासोबतच अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाही होऊ शकतो. तातडीच्या कामांसाठी वेगवान प्रवासाच्या दृष्टीनेही या सेवेचा लाभ होऊ शकतो. वर्धा लोकसभा क्षेत्रातील नागपूर-भुसावळ-नागपूर पॅसेंजर, वर्धा-भुसावळ-वर्धा पॅसेंजर, काझीपेठ पॅसेंजर, अमरावती – नागपूर लोकल पॅसेंजर एकाच वेळी रद्द करण्यात आल्या.

ग्रामीण भागात सुपरफास्ट आणि एक्सप्रेस गाड्या थांबत नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे तसेच इतरही प्रवासाकरिता साधन उपलब्ध नाही. कोविड -19 नंतर पुन्हा अनेक रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. तीनही पॅसेंजर गाड्या सुरू करुन सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी खा. रामदास तडस यांनी शुन्य काळामध्ये केली.
कोरोना प्रादुर्भाव कमी होत असून रुग्णसंख्या घटू लागल्यामुळे पॅसेंजर गाड्यांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास मुभा देण्याची आवश्यकता आहे. 10 महिण्यांपेक्षा जास्त काळ ह्या सेवा बंद असल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. केंद्र सरकाने सर्वसामान्य नागरिकांचे हित लक्षात घेऊ पॅसेंजर गाड्या सुरू व्हाव्या असे खा. रामदास म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here