कराटे बेल्ट वितरण सोहळा
कूंदन मार्शल आर्ट कल्ब गोंडपिपरी तर्फे बेल्ट वितरण
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :-दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोज रविवार ला कुंदन मार्शल आर्ट क्लब गोंडपिपरी तर्फे बेल्ट एक्झामिनेशन व बेल्ट वितरण सोहळा सुभद्राबाई सांगळा पाटील आश्रम शाळा गोंडपिपरी येथे पार पडला.कार्यक्रमाकरिता विशेष अतिथी म्हणून माननीय भीमानंद चिकाटे सर बफरझोन शिवनी ,माननीय रंगनाथ पेडूकर सर मुल तर अध्यक्ष म्हणून माननीय पिसे सर प्राचार्य सुभद्राबाई सांगडा आश्रम शाळा गोंडपिपरी हे लाभले. पालकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदारसरांनी तर सूत्रसंचालन गणेश गेडाम सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुधीर अवथरे, श्री अलोने,श्री खामनकर यांनी सहकार्य केले.
प्रथमता विद्यार्थ्याची बेल्ट एक्झाम घेण्यात आली. 40 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्यात आरोही अवथरे हिला ऑरेंज बेल्ट तर स्वरा गणेश गेडाम , तपस्या गणेश गेडाम, यथार्थ अवथरे , अगस्ट अलोने, नितिषा अलोने ,ओमकार केदार आराध्या चौधरी ,भाविका चौधरी साहिल राजूरकर ,गौवरान चौधरी, स्वयम् माडुरवार, आयुष पिंपळशेंडे, गुंजन गुडपल्ले ,देवांग गुडपल्ले ,आराध्य वड्डेवार यांना येलो बेल्ट पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सेन्साई चिकाटे सर ब्लॅक बेल्ट 5डान मुख्य परीक्षक तर सेन्साई रंगनाथ सर ब्लॅक बेल्ट 4 डान सहाय्यक परीक्षक व कुंदन पेंदोर सर ब्लॅक बेल्ट 1डान यांनी इंस्ट्रक्टर म्हणून कार्य पाहिले.
सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
कुंदन मार्शल आर्ट क्लब गोंडपिपरी तर्फे शिवनी बफर झोन ,डिस्टिक लेव्हल चंद्रपूर, स्टेट लेवल चंद्रपूर, स्टेट लेव्हल वनी जिल्हा यवतमाळ येथे गोल्ड, सिल्वर ,ब्रांझ मेडल पटकाविले होते. तसेच जवळपास 15 शाळेत मुलींना आत्मरक्षणाचे निशुल्क कराटे प्रशिक्षण देण्यात आले होते करिता तालुका कराटे प्रशिक्षक कुंदन पेंदोर सर यांचे सगळीकडून गुणगौरव करण्यात आले होते हे विशेष