सावंगीच्या सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा १४/०२/२०२२
समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकासाठी लोकसहभागातून सेवाकार्य निर्माण करणे आवश्यक आहे. सरकारलाही काम करताना मर्यादा असतात. अशावेळी सार्वजनिक खाजगी भागीदारीतून हे शक्य होते. गोरगरिबांची सेवा करण्याच्या दृष्टीने मेघे समूहाने केलेले कार्य ही मोठी देण आहे. सामाजिक दायित्वाचे ऋण समाज विसरत नाही असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सावंगी येथे दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सिद्धार्थ गुप्ता मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यात आज रविवार 13 रोजी ना. गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी अभिमत विद्यापीठाचे कुलपती व रुग्णालय समूहाचे संस्थापक दत्ता मेघे होते. तर पालकमंत्री सुनील केदार, प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, खा. रामदास तडस, आ. रणजित कांबळे, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, आ. डॉ. पंकज भोयर, धामणगावचे आ. प्रताप अडसड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे, विश्वस्त सागर मेघे, आ. समीर मेघे, प्रतिभा गुप्ता, राधिका गुप्ता, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, प्रकुलगुरू डॉ. ललित वाघमारे, कुलसचिव डॉ. बाबाजी घेवडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, आदींची उपस्थिती होती.