प्रहार जनशक्ती पक्षाच्या धरणे आंदोलनाला यश .. रुग्णमित्र मा. श्री . गजुभाऊ कुबडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन…

60

प्रहार जनशक्ती पक्षाच्या धरणे आंदोलनाला यश ..

रुग्णमित्र मा. श्री . गजुभाऊ कुबडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन…

प्रहार जनशक्ती पक्षाच्या धरणे आंदोलनाला यश .. रुग्णमित्र मा. श्री . गजुभाऊ कुबडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन...

✒ करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी – 8806839078

हिंगणघाट : १४ फरवरी २०२२ सोमवार, रोजी तालुक्यामध्ये येत असलेल्या सावली (वाघ) येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार पक्षाचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र मा. गजुभाऊ कुबडे यांनी केले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. तसेच सावली (वाघ) या भागातील असणाऱ्या गिट्टीखदानीवरील अवजड वाहनांना गावामधून प्रवेश बंदी घालण्यात यावी आणि बस स्थानक सावली वाघ ते सेलू या रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रेटीकरण करण्यात यावे. या प्रमुख दोन मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन असेच सुरू राहतील अशी माहिती रुग्णमित्र मा. श्री . गजुभाऊ कुबडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.
तसेच सायंकाळी उशिरा सहा वाजता तहसीलदार साहेब हिंगणघाट , यांनी आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन खड्डेमय झालेल्या रस्त्याचे काम हे उद्यापासून सुरू करण्यात येईल व अवजड वाहतूक बंद करण्यासाठी परवाला कलेक्टर साहेबांसोबत बैठक घेण्यात येईल व त्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले. यावेळी मा. पाचखेडे साहेब तलाठी सावली (वाघ) शाखाप्रमुख दिपक पावडे, अनंतराव वायसे, पराग तिखट ,करण विटाळे, गजानन जरिले, प्रकाश गौळकार, प्रकाश मन्ने, ईश्वर पुरी, रमेश राठी, किशोर देवगिरीकर, व आदी गावकरी उपस्थित होते.
परंतु गावातील प्रथम नागरिक म्हणून ओळखले जाणारे गावातील सरपंच व ग्रामपंचायतमधील अधिकारी यांची उपस्थिती नसल्याने हे कुठेतरी खदानि मालकांकडून मिळत असलेल्या आर्थिक बजेट मुळे कुनाच्या दबावाखाली तर नाही ना अशी नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे