Valentine Day:  प्रेम द्यावे अन् प्रेम घ्यावे…!

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

चौदा फेब्रुवारी या दिवशी व्हलेंन्टाईंडे,प्रेमाचा दिवस म्हणून मोठ्या आनंदाने हा दिवस साजरा करतात. सर्वात जास्त उत्साह तरूण पिढीमध्ये असतो त्यामुळे ते,एखाद्या पर्यटनस्थळी, निसर्गरम्य किंवा एखाद्या महाग असलेल्या हॉटेल मध्ये जाऊन जेवण करतात, मस्तपैकी फिरून येतात ह्या, सर्व गोष्टी करतेवेळी आपल्या कडून काहीही वाईट घडणार नाही याची मात्र काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे. प्रेम हे, आंधळे असते असे अनेकजण म्हणत असतात.पण, एवढेही आंधळे नसायला पाहिजे की,आयुष्यभर पश्चातापात पडण्याची वेळ आपल्यावर येईल. .प्रेमाला उपमा नसते, प्रेम निर्मळ, पवित्र असतो, प्रेमाला रंग नसते, प्रेमाला राग, क्रोध नसतो प्रेमाला कशाचीही अपेक्षा, आवश्यकता नसते कारण, प्रेम हे, शेवटी प्रेमच असतो अजरामर असतो पण, आजच्या घडीला बघितले तर. .प्रेमासारख्या पवित्र नावाला सुद्धा कलंकित करून सोडले आहेत. प्रेमाला बदनाम करत आहेत एवढेच नाही तर..काहीजण प्रेम करण्याचे ढोंग रचून एखाद्याच्या जीवनाशी खेळत असतात ह्याला खरच प्रेम करणे म्हणतात का. .? खऱ्या प्रेमाची महती त्यांना मुळात कळलीच नसते म्हणून ते,अशा प्रकारे वागत असतात. अशी वृती असलेल्या लोकांपासून सावध रहावे.

         त्याच प्रमाणे मागे गेलेल्या काही काळापूर्वी, वर्षापूर्वी याच पृथ्वीवर एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे अजरामर होऊन गेलेले नाव आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असतील राधा कृष्ण, राम सीता, नल दमयंती, हिर रांजा, लैला मजनू यांच्या विषयी विचार करून बघावे त्यांनी कशा प्रकारे एकमेकांवर ती प्रेम केले असतील. .?म्हणून आजही त्यांच्या प्रेमाला सारा जग वंदन करत आहे , त्यांना ‌मोठ्या श्रद्धेने पूजत आहे कारण, ते, स्वंयम निर्मळ, नि:स्वार्थी, व त्यागी होते. म्हणूनच म्हणतात ना की, त्यागा मधूनी पुण्य मिळे आपण ऐकलेले असणार. ..म्हणून राधेने क्रिष्णावर अफाट प्रेम केलं होतं तरीही ती आयुष्यभर क्रिष्णापासून कोसोदूर राहीली तरीही तिच्यातील विश्वास, प्रेम , क्षणभरासाठी सुद्धा कमी झाला नाही. राधा क्रिष्णाचे जरी लग्न झाले नसले तरी आजही ते, वंदनीय, पुज्यनिय आहेत. “आदराने राधाकृष्ण” म्हणतात. राधे, राधे उद्गार मुखातून बाहेर पडतात हे, फुकटच नाही. या विषयी आपण चांगल्याप्रकारे अभ्यास केल्याने कदाचित थोडसं तरी नक्कीच उत्तर सापडेल…ज्या,प्रमाने आई ,तिच्या पोटात बाळ वाढत असतो तेव्हापासून तर..तिच्या जिवात, जीव असेपर्यंत ती, आपल्या लेकरावर सारखीच प्रेम करत असते, तिचा प्रेम कधीच कमी होत नाही म्हणून ती जननी आहे. तिच्या प्रेमाची कदर करायला पाहिजे. तिच्याच सारखे प्रेम द्यायला शिकले पाहिजे व प्रेम करायला सुध्दा शिकले पाहिजे. त्याच प्रमाणे बापाचे कष्ट सुद्धा जाणून घेतले पाहिजे, कारण बाप कधीही रडताना दिसत नाही पण, लढताना मात्र सदैव दिसत असतो.त्याच्या डोळ्यातीत अश्रू व चेहऱ्यावर दिसणारे भाव प्रत्येक मुलांनी व मुलींनी ओळखायला शिकले पाहिजे. बापाचे प्रेम जरी दिसत नसले तरीही लेकरांसाठी त्याची धडपड चालूच असते हे, सर्व जाणून घेणे आजच्या घडीला काळाची गरज आहे.

         त्याच प्रमाणे या पृथ्वीवर असे कित्येक प्राणी, पक्षी, हिरवेगार झाडे, दरी जंगल, नदी नाले आहेत ते, कसे सर्वांवर एकसारखे प्रेम करतात त्यांच्याकडून आपण शिकले पाहिजे, खरी प्रेमाची व्याख्या कळल्या शिवाय राहणार नाही. जेवढे प्रेम आपण स्वतः वर करत असतो त्यातील थोडं तरी प्रेम पुस्तकां वरती केले पाहिजे कारण, पुस्तके जगायला शिकवत असतात व गुरु बणून योग्य वाटेवर चालण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. प्रेम करावे पण, त्या 

प्रेमात स्वार्थाची भावना मुळात नसायला पाहिजे , प्रेम करण्याचे अनेक प्रकार आहेत तसेच प्रेम करावे तिथून इतरांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल…प्रेम हे सदैव निर्मळ असते तेवढेच शक्तीशाली सुध्दा असते प्रेमाने दोन शब्द बोलल्याने माणसं जुळून येतात भलाही ते मदत करत नसले तरी न करताच खूप काही करवुन दाखवतात या विषयी ते, कळू सुद्धा देत नाही. म्हणून प्रेमाची महानता जाणून प्रेमाने बोलावे, प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेम करावे व प्रेमाला समर्पित होऊन जावे. व एक चांगली व्यक्ती म्हणून नावारूपाला यावे यासाठी आपल्या मनात इतरांविषयी आपुलकी, निर्मळ प्रेम व दया असणे गरजेचे आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक होते. असेच प्रेम आपल्यात कायमच असू द्यावे. व व्यर्थ गोष्टींचा त्याग करून नव्याने पुन्हा एकदा जगायला लागावे. आपली संस्कृती जपावे नक्कीच खऱ्या प्रेमाची साथ मिळेल व सुखी जीवन जगायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here