ग्रामपंचायत कडोली च्या कारभाराला कंटाळून अखेर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रेमसागर बोंडे यांनी दिला आंदोलनाचा इशारा पंचायत समिती कार्यालय कोरपना यांना दिले निवेदन : युवक काँग्रेस कमिटी कोरपना

53
ग्रामपंचायत कडोली च्या कारभाराला कंटाळून अखेर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रेमसागर बोंडे यांनी दिला आंदोलनाचा इशारा पंचायत समिती कार्यालय कोरपना यांना दिले निवेदन : युवक काँग्रेस कमिटी कोरपना

ग्रामपंचायत कडोली च्या कारभाराला कंटाळून अखेर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रेमसागर बोंडे यांनी दिला आंदोलनाचा इशारा

पंचायत समिती कार्यालय कोरपना यांना दिले निवेदन : युवक काँग्रेस कमिटी कोरपना

ग्रामपंचायत कडोली च्या कारभाराला कंटाळून अखेर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रेमसागर बोंडे यांनी दिला आंदोलनाचा इशारा पंचायत समिती कार्यालय कोरपना यांना दिले निवेदन : युवक काँग्रेस कमिटी कोरपना

✍🏻मनोज गोरे✍🏻
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मोबाईल नं.9923358970

कोरपना :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे कि, गेल्या काही दिवसापासून दशरथ श्रीरसागर यांच्या घरा जवळ ये -जा करणाऱ्या रोडावर बांधकाम करण्यासाठी गिट्टी टाकण्यात आली आहे आणि त्या रोडवर असलेल्या गिट्टी मुळे वाहतुकीस ये-जा करण्यासाठी कडोळी गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्या मुळे गिट्टी मालक [ठेकेदार] ला अनेक वेळा सांगून सुद्धा त्या ठेकेदाराने अजून ती गिट्टी उचललेली नाही त्या गिट्टी मुळे ये -जा करणाऱ्या नागरिकांचे अपघात होन्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ती गिट्टी तत्काळ उचलण्यात यावी आणि त्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

तसेच आपल्या गावातील शालेय विधार्थाना अभ्यासाची ओळ लागावी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा या दृष्टीने वाचनालय शासनाने दिले असून त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कडोली ग्रामपंचायत कार्यालाची आहे आणि ते तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे तसे हमी पत्र ग्रामपंचायत कार्यालयाने जिल्हा परिषद ला दिले आहे. परंतु ग्रामपंचायत च्या चुकीचा कारभार मुळे वाचनालय चे विद्युत बिल न भरल्या मुळे दोन महिन्या पासून वाचनालयात लाईट नाही वारंवार फोन द्वारे सांगून सुध्दा दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाचनालय बंद अस्वस्थेत धुळ खात बंद आहे. त्याचा शालेय विधार्थाच्या अगदी परीक्षेच्या तोंडावर असताना अभ्यास करण्यासाठी त्रास होत आहे. त्याची आपण दखल घेऊन तत्काळ उपाय योजना करून लवकरात लवकर त्या वाचनाल्याची दुरुस्ती करून लाईटची व्यवस्था करण्यात यावी अन्यता शाळेचे विध्यार्थी व गावकरी यांचा उपस्थित ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेस कमिटी कोरपना तालुकाध्यक्ष प्रेम सागर बोंडे यांच्या कडून या निवेदनात देण्यात आला आहे आणि याची आपण दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी विनंती देखील करण्यात आली आहे. तेव्हा या तक्रारीची वरिष्ठ अधिकारी दखल घेतली काय याकडे समस्त कडोली ग्रामवासियांचे लक्ष लागले आहेत.