इयत्ता बारावी वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

57
इयत्ता बारावी वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

इयत्ता बारावी वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

इयत्ता बारावी वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.९९२३३५८९७०

कोरपना:- स्व. संगिता चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपना येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचाली करिता बारावीनंतर करियर कसे उज्वल करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच परीक्षा संदर्भातील असणारी भीती व अभ्यास संदर्भातील विचार मांडण्यात आले. बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी विविध अभ्यासात्मक खेळाचे देखील आयोजन केले होते व उत्कृष्ट विद्यार्थ्यांना शाळेतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विशेष सहयोग माननीय. चेतन सर, प्राचार्य खडसे सर, इयत्ता अकरावीचे विद्यार्थी, वर्गशिक्षक प्राध्यापक रणदिवे सर, प्राध्यापिका वनकर मॅडम यांचे सहकार्य प्राप्त झाले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी. प्राध्यापक . उपलांचीवर सर, जाधव सर, गावडे सर , पतरंगे मॅडम, कांबळे मॅडम ,कवठे सर, गेडाम सर व विद्यार्थी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.