जनावरांना ही होतो कॅन्सर,तातडीने उपचार गरजेचे

36

जनावरांना ही होतो कॅन्सर,तातडीने उपचार गरजेचे

रत्नाकर पाटील रायगड ब्यूरो चीफ ४२०३२५९९३

अलिबाग:- मोठ्या जनावरांमध्ये डोळे, प्रजनन संस्थेचे विविध अवयव, मोठे आतडे आणि शिंगा मध्ये तर छोट्या जनावरांमध्ये तोंड, मूत्राशयाचा कर्करोग आढळून येत आहे. लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात. दुधाळ व पाळीव प्राण्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरूक राहून तातडीने उपचारासाठी धाव घेणे महत्त्वाचे असल्याची माहिती तज्ञांनी दिली. कर्करोग हा शरीरातील पेशीच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. आणि जनावरांमध्ये विविध अवयवांमध्ये दिसून येतो.

पशु तपासणी,
निरोगी आहार, प्रदूषणापासून संरक्षण देत पशुधनाची जपणूक करावी.तसेच तज्ञांच्या संपर्कात राहून त्यांच्याकडून आरोग्याच्या निगे विषयी माहिती जाणून घ्यावी. गाठी किंवा सूज, वजन कमी होणे, कमी खाणे पिणे ,काम करण्याची शक्ती कमी होणे ,थकवा, उपचार पद्धती, शास्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आधी आदि कर्करोगाची लक्षणे जनावरांमध्ये दिसून आल्यावर तातडीने उपचार यंत्रणाशी संपर्क साधावा.
जनावरांमध्ये ही कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खबरदारी म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संपर्क साधने महत्त्वाचे आहे. असे रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग अधिकारी डॉ. श्याम कदम यांनी सांगितल.

*कर्करोगाचे दोन प्रकार* १)बिनिग्र कॅन्सर:- हळूहळू वाढणारा हा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरत नाही. याला शस्त्रक्रियेने काढता येते आणि त्यानंतर पुन्हा होण्याची शक्यता कमी असते
२) मेलिग्रेट कॅन्सर:- मेलीग्रेट कॅन्सर जलद गतीने वाढण्यास आणि शरीराच्या इतर भागात पसरणारा कर्करोग याचा धोका गंभीर असतो. आणि त्यासाठी किमोथेरपी, रेडिएशन थेरपी यासारखे उपचारांची आवश्यकता असते