रायगडात जिबीएस ची भीती पाणी तपासणी होणे गरजेचे

47

रायगडात जिबीएस ची भीती
पाणी तपासणी होणे गरजेचे

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग: – गुईलेन बेरी सिंड्रोम हा आजार पाण्यामुळे होत असल्याचे दिसून आले आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत जीबीएस चा एकही रुग्ण सापडला नाही अशुद्ध पाणी पिण्यात येत असल्याने इतर जिल्ह्यात दिवस रुग्णाच्या संख्येत भर पडत आहे. याच जीबीएस मुळे काही जिल्ह्यात रुग्णही दगावले आहेत. त्यामुळे आता आपल्या घरातील नळाला येणारी पाणी तसेच आरओ चे पाणी तरी शुद्ध आहे का तपासणी गरजेचे आहे.
पाण्याची गुणवत्ता पिण्यायोग्य आहे का, घरोघरी नळाला येणाऱ्या पाण्याने जीबीएस होऊ शकतो का? हे शोधण्यासाठी प्रशासन कसे प्रयत्न करीत आहे. परंतु नागरिकांनाही स्वतःची काळजी घेतली पाहिजे . पाणी गडूळ येत असेल तर ते पाणी उकळून पिणे गरजेचे आहे. अन्न चांगल्या प्रकारे शिजवून खावे. जीबीएस चा आजार होऊ नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
अस्वच्छता, पाणी दूषित असणे हे या आजाराला कारणीभूत ठरू शकतात. वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. तसेच वेळेत उपचार केल्यास 95 टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहेत. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत जीबीएस चा एकही रुग्ण नाही अशी माहिती रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात जीबीएस चा एकही रुग्ण आढळून आला नाही. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने अगोदरच खबरदारी घेतली आहे. तातडीने उपाययोजना केल्या असून जिल्ह्यात जीबीएस चा एकही रुग्ण नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जीबीएस हा आजार दूषित पाण्यामुळे होत आहे. दूषित पाण्यामुळे अन्य आजारही उद्भवू शकतात. जीबीएस हा आजार आहे आणि त्यांना जुनाच आजारआहे.अनेकांना हा आजार होत असतो. त्यातून रुग्ण बरे सुद्धा होत असतात. योग्य ती खबरदारी घेतल्यास हा आजार टाळता येतो. याच्यावर योग्य उपचारही होत आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.