एकाच परीवारातील 5 लोकांनी केली समुहिक आत्महत्या.

59

 एकाच परीवारातील 5 लोकांनी केली समुहिक आत्महत्या.

5 members of the same family commit mass suicide.

क्राईम रिपोर्टर✒
बिहार,दि.13 मार्च:- राज्यातील सुपौल येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नाबालीग तीन मुलांसह पती-पत्नीने एकाच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतांमध्ये पती-पत्नीसह 2 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. तिघांचे मृतदेह एकाच रूममध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले. या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली. कुटुंबाचा कोळसा खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता, पण त्यात यश येत नव्हते. या कुटुंबात कुणीही जास्त शिकलेले नाही. फक्त मुलगाच शिक्षण घेत होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

प्राप्त माहितीनुसार राघोपुर पोलिस स्टेशन क्षेत्रातील वार्ड क्र. 12 येथे मयत मिश्री लाल साह वय 52 वर्ष, त्याची पत्नी रेणु देवी वय 44 वर्ष, मोठी मुलगी रोशन कुमारी वय 15 वर्ष, लहान मुलगी वय 08 वर्ष, मुलगा ललन कुमार वय 14 वर्ष यांनी समुदायीक आत्महत्या केली आहे. काही शेजा-यांनी मिश्रीलाल यांचा मुलाला ललन कुमार ला शेवटच सोमवार ला बघीतल होत. पोलिस मृत्युच कारण शोदत आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्या नंतर खर कारण समोर येऊ शकते.