Kanchan Yeskar murder case in Nagpur Kumbhapur, husband and mother-in-law stabbed Kanchan to death.
Kanchan Yeskar murder case in Nagpur Kumbhapur, husband and mother-in-law stabbed Kanchan to death.

नागपुर कुंभापूर येथे पती आणि सास-याने केली कुऱ्हाडीने सपासप वार करून कांचनची हत्या.
कांचन ला न्याय मिळाला पाहीजे. मुख्य सूत्रधार दिवाकर येस्कर आहे याला अटक झालीच पाहिजे म्हणून वंचित बहूजन आघाडी पोलिस निरीक्षकाना निवेदन.

Kanchan Yeskar murder case in Nagpur Kumbhapur, husband and mother-in-law stabbed Kanchan to death.
मृतक कांचन अभय येस्कर

✒️युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒️
नागपुर,दि.12 मार्च:- जिल्हातील मौदा तालुक्यातील कुंभापुर येथे नात्याला आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सासरा आणि नव-याने संगममत करुन आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली. या खळबळजनक घटनेमुळे संपुर्ण नागपूर जिल्हा हादरला आहे.

नागपूर जिल्हातील मौदा तालुक्यात कुंभापूर या गावात सौ, कांचन अभय येस्कर या तरुण विवाहित महिलेला तिचा नवरा अभय येस्कर तिचा सासरा नराधम दिवाकर येस्कर यांनी शेतात नेऊन भरदिवसा दुपारी 4 वाजताच्या सुमारात मुलगा होत नाही व माहेरून पैसे मागून आन या कारणासाठी कुऱ्हाडीने सपासप वार करून घटनास्थळी मारून टाकले. कांचनला पहिली मुलगी झाली तेव्हा पासून तिच्या सासरच्या लोकांनी तिच्यावर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. त्यानंतर दुसरी मुलगी झाली त्यामुळे जास्त च छळ करणे सुरू केले. तिचा सासरा तिच्यावर वाईट नजरेने पाहायचा, त्याने तिला चक्क शरीर सुखाची मागणी केली. तेव्हा तिने नवऱ्याला सांगितले तर नवऱ्याने कांचनलाच बेधुम मारले तिचा सासरा दिवाकर येस्कर हा मुलाला म्हणे इला मारून टाक मी दुसऱ्या दिवशी दुसरी बायको करून देतो. शेवटी नवऱ्याने कांचनला मारूनच टाकले. भर दिवसा तिला तडफडत तडफडत मारून टाकले. काय गुन्हा होता तिचा? तिने सुंदर दोन मुलीला जन्म दिला हा गुन्हा आहे काय? मुलीच्या जागी मुलगा झाला नाही हा तिचा गुन्हा आहे का?

Kanchan Yeskar murder case in Nagpur Kumbhapur, husband and mother-in-law stabbed Kanchan to death.

मौदा पोलिसांनी फक्त तिच्या नराधम नवऱ्यालाच अटक केली. मुख्य सूत्रधार दिवाकर येस्कर आहे याला अटक झालीच पाहिजे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाङीच्या वतीने मौदा पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे साहेब यांना जिल्हा महासचिव प्रमोदभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली व वरिष्ठ जिल्हा महासचिव फुलसर सतीबावणे, प्रविण बागडे जिल्हा उपाध्यक्ष, संजय मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष, मधुकरराव बागडे जिल्हा उपाध्यक्ष, हर्षानंद भगत जिल्हा महासचिव, ओबीसी नेते वारकरी संप्रदायचे गणपतराव हातेकर, सोनाली गोंडाने जिल्हा संघटिका, वैशाली वासनिक सामाजिक कार्यकर्त्या, भरतजी नानेट कामठी शहराध्यक्ष, दीपक अंगुले मौदा तालुका अध्यक्ष, मा तिकेत मेश्राम विजय डोंगरे, मुन्ना मानवटकर तालुका महासचिव तसेच तसेच मृतक भगिनी कांचनची आई व भाऊ निर्मलाबाई तळवटकर, मावसा सुशील ठमके कांचनचे मामा व अन्य परिवार प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here