आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते निजामगोंदी येथे रस्ते, नाली बांधकामाचे भूमिपूजन.

44

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते निजामगोंदी येथे रस्ते, नाली बांधकामाचे भूमिपूजन.

Bhumi Pujan of construction of roads and drains at Nizamgondi by MLA Subhash Dhote.

संतोष मेश्राम
राजुरा तालुका प्रतिनिधी

राजुरा:- सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 1 चंद्रपूर मधील खनिज विकास निधी अंतर्गत मौजा निजामगोंदी येथील समाज मंदिर ते जि प शाळे पर्यंत नाली बांधकाम आणि शामराव पेन्दोर ते हनुमान मंदिर पर्यंत २० लक्ष किंमतीचे सिमेंट काँक्रिट रोडचे बांधकाम या कामाचे भुमीपुजन आमदार सुभाष धोटे यांचा हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी कल्पनाताई पेचे जि प सदस्य, सिंधुताई आस्वले उपसभापती, उत्तमराव पेचे माजी जि प सदस्य, पुरुषोत्तम राजूरकर उपसरपंच खिर्डी, संभा पाटील चाहकाटी, शामराव सलाम माजी सरपंच, चिनू पाटील मेडमे, लिंगु पाटील चाहकाटि, शुभकांत शेरकी, अशोक मडावी , दीपक खेकारे, विकास मडावी महासचिव राजुरा विधानसभा, रोशन आस्वले, फकरू पाटील चाहकाटी, पंगू मडावी, महादेव चाहकाटी, दौलत पेंदोर, बापूराव नागोसे, उपअभियंता पिंजारकर, अभियंता संदीप सुदेवाड, ठेकेदार अनिल मंगरुळकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.