सन्मानाच्या जीवनासाठी समता सैनिक दलाच्या छताखाली एकत्र या – जिल्हा संघटक अभय कुंभारे

52

सन्मानाच्या जीवनासाठी समता सैनिक दलाच्या छताखाली एकत्र या – जिल्हा संघटक अभय कुंभारे

Come together under the umbrella of Samata Sainik Dal for a life of dignity - District Organizer Abhay Kumbhare

प्रशांत जगताप ✒
वर्धा:- आपल्या स्वार्थामुळे, अहंकारामुळे आणि बेजबाबदारपणामुळे आंबेडकरी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा आपला स्वार्थ आपण महत्वाचा मानला.तेव्हा आपले फालतू अहंकार, स्वार्थ आणि बेजबाबदारपणा सोडून संपूर्ण समाजाच्या हितासाठी आणि सन्मानाच्या जीवनासाठी समता सैनिक दल या मात्रुसंघटनेच्या छताखाली एकत्र येणे ही आज काळाची गरज आहे, असे वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे यांनी प्रतिपादित केले.

ते समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय, या अभियानांतर्गत समता सैनिक दलाच्या शाखा स्थापन करण्यासंदर्भात सम्राट बुद्ध विहार, कवडघाट तालुका-हिंगणघाट येथे संपन्न झालेल्या सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सम्राट बुद्ध विहार समितीच्या अध्यक्षा आयुष्यमती ममता पाटील, वर्धा जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर सभेला मार्शल रणवीर वरके, अंकेश भोंगाडे, लोकेश वावरे, आकाश रामटेके, अमोल रामटेके, रविंद्र कळसकर, संजय मेश्राम, पियुष खोब्रागडे, अतुल पाटील, प्रणय रामटेके, योगेश रामटेके, विक्रम रामटेके, प्रेमदास डोंगरे, सिद्धार्थ गायकवाड, राहुल पाटील, सुजाता नगराळे, प्रतिभा खोब्रागडे, प्रशिल भोंगाडे, सुरेश शंभरकर, व्ही.बी.खोब्रागडे, संदीप येसनकर आदी बौद्ध बांधव तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.