Director of counterfeit checks arrested in fraudulent loan case
Director of counterfeit checks arrested in fraudulent loan case

कोरोडो रुपयाची फसवणुक करणा-या, बनावट कर्ज प्रकरणात नकली धनादेश प्रिंटिंग संचालकाला अटक.

 Director of counterfeit checks arrested in fraudulent loan case

आशीष अंबादे प्रतिनिधि ✒
हिंगणघाट,दी 15 मार्च:- संपुर्ण महाराष्ट्रातील अनेक लोकांना लोनच्या नावाने लूटणा-या कंपनीचा भंडाफोड झाला होता. आता हिंगणघाट पोलिसांनी विदेशातील इंडोनेशिया येथील बैंकचे बनावटी चेक बनवना-या आरोपीला अटक केली आहे. आत्मनिर्भर प्रोत्साहन योजनेच्या नावावर तरुणांची कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकरणात नकली चेक व इएमआय कार्ड बनविणाऱ्या प्रिंटिंग संचालकाला पोलिसांनी वडाळा मुंबई येथून अटक केली आहे.

विजन ऑफ लाईफ फाऊंडेशन एनजिओचे नांवाने हिंगणघाट शहरात बेरोजगारांना 5 लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवीत बेरोजगारांना नकली धनादेश देऊन फसवणूक करण्या प्रकरणातील आरोपी सीमांचल नारायण पंडा यास पोलिसांनी अटक केली आहे. चेक व इएमआय कार्ड बक्षीस द्यायचे आहे असे सांगून त्यांना या कामाचे 23 हजार रुपये आशिष डे यांनी दिले होते.

 Director of counterfeit checks arrested in fraudulent loan case

ऑर्डर नुसार 2600 नकली चेक व इएमआय कार्ड बनवून घेतले असल्याचे साकीनाका मुंबई येथील कमल प्रिंटिंग प्रेसचे संचालक सीमांचल पांडा यांनी दिल्याची माहिती ठाणेदार संपत चव्हाण यांनी दिली. सीमांचल पांडा यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अधिक माहिती घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक आरोपी पांडा ला घेऊन मुबंई ला रवाना झाले आहे. या प्रकरणाचा पुढिल तपास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर उपविभागीय अधिकारी दिनेशजी कदम ठाणेदार संपतजी चव्हान यांच्या मार्गदर्शनात पिएसआय गिरधर पेंदोर,पि एसआय सादिक शेख पोलिस कर्मचारी मनोज लोहकरे प्रशांत वाढई दिपक मस्के करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here