हैप्पी हेल्प फाऊंडेशन मिरज, वतीने गरजु विध्यार्थाना शालेय साहित्य वाटप.
हैप्पी हेल्प फाऊंडेशन मिरज या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा खटावमधील गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप
✒मिरज प्रतिनिधी✒
मिरज दि, 14 मार्च :- आज जिल्हा परिषद केंद्रशाळा खटावमध्ये हैप्पी हेल्प फाऊंडेशन मिरज या संस्थेच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य (वही, पेन, पट्टी, पेन्सिल, कंपास, वाटर बॉटल, बँग) वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरूवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील जाधव, उपाध्यक्ष प्रशांत कदम, सल्लागार अमित कांबळे, अभिजीत पाटील, सौ. कांबळे मेडम, अड्व्होकेट पुजारी साहेब, रावसाहेब बेडगे, अजित खटावकर व बजरंग व्हनमोरे व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होतें. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बसवराज तेली यांनी केले. या संस्थेचे सल्लागार अमित कांबळे यांनी शाळेत राबविल्या जाणारया वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. पुजारी यांनी हसत खेळत आपल्या जीवनात आई वडील, शिक्षक हे आपले खरे देव आहेत़ तसेच अभ्यास कसा करायचा याचेही मार्गदर्शन केले.
या संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत कदम यांनी या संस्थेची स्थापना कशी झाली, ही संस्था महापूर कोरोना या काळामध्ये गरजू लोकांपर्यंत कशी पोहचली याचेही विवेचन केले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. स्वागत सुनिल लांडगे व आभार सहदेव बागी सर यांनी केले.