जीवे मारले तरी चालेल पण प्रकल्पात चोरी करणाऱ्या विकासक विमल शहा, महादलाल मुरजी पटेल व भ्रष्ट अधिकाऱ्यांना गजाआड केल्याशिवाय शांत बसणार नाही. डॉ. राजन माकणीकर

68

जीवे मारले तरी चालेल पण प्रकल्पात चोरी करणाऱ्या विकासक विमल शहा, महादलाल मुरजी पटेल व भ्रष्ट अधिकाऱ्यांना गजाआड केल्याशिवाय शांत बसणार नाही. डॉ. राजन माकणीकर

It will work even if it kills, but it will not be quiet unless the developers Vimal Shah, Mahadlal Murji Patel and corrupt officials who stole from the project are brought to book. Dr. Rajan Makanikar

मुंबई दि.13 (प्रतिनिधी) शासनाच्या प्रकल्पात विकासक विमल शहा, महादलाल मुरजी पटेल व काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आदर्श पेक्षा मोठा घोटाळा केला असून या हरामखोरांना तुरुंगात डांबून वंचितांना न्याय मिळवून दिल्या शिवाय शांत राहणार नाही अश्यावेळी जीव गेला तरी बेहत्तर! अशी ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धिमाध्यंमांना दिली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राष्ट्रीय महासचिव डॉ. माकणीकर व राज्य महासचिव कॅ. श्रावण गायकवाड यांनी असे म्हटले आहे की, शासनाच्या प्रकल्पात विकासक विमल शहा, महादलाल मुरजी पटेल व उद्योग सारथी आणि एम.आय.डी.सी पोलीस ठाणेचे काही भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने फार मोठा घोटाळा केला असून शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून स्वतःची पोळी भाजून मूळझोपडी धारकांना वाऱ्यावर सोडले आहे, आजही २० वर्ष झाले कित्येकांना सदनिकेचा ताबा देण्यात आला नाही तर कित्येकांना भाडे धनादेश देण्यात आले नाही.

विकासक विमल शहा ने एमआयडीसी सोबत झालेल्या कराराप्रमाणे २२.५०% प्रमाणात झोपडीमुक्त व संक्रमण शिबिरासाठी दिलेली जागा परत करावयाची होती मात्र अद्यापही ती जागा विकासकाने परत केलेली नसतांना एमआयडीसी संबंधित अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे सदरची जागा लवकरात लवकर ती जागा सक्तीने परत घेण्यात यावी.

८% जागा करमवणुकीच्या मैदानसाठी असतांना विकासकाने मैदान ना देता आकृती सेंटर पॉईंट या व्यावसायिक इमारतीमध्ये समावेश करून जागा हडप केली आहे, ही जागा सेंटर पॉईंट च्या ताब्यातून काढून तात्काळ मैदानात समाविष्ट करावी.

विकासकाने सांगितल्यामुळे २००६ सालात १०७ झोपड्या अपात्र ठरवून त्या वगळल्या होत्या मात्र त्या फक्त कागदी वगळण्यात येऊन आधीच सदनिका देण्यात आल्या होत्या, त्या खाली करवून घेण्यात आल्या नाहीत, त्या सदनिका तात्काळ खाली करण्यात याव्यात.

नुकतेच महादलाल ४२० मुरजी पटेल यांच्या मार्फतीने गणेशवाडी रहिवाशी संघ डॉ बाबसाहेब आंबेडकर नगर रहिवाशी संघ येथे घुसखोरी करवली आणि एम.आय.डी.सी ला माहितीस्तव सांगितले, मात्र: सदरच्या सदनिका ह्या विकासकाच्याच ताब्यात असतांना घुसखोरी होते कशी? म्हणजे विकासक महादलाल मुरजी पटेल व भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने झालेला हा प्रकार आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे, सदर घुसखोरांना बाहेर काढून त्यांच्या सदनिकाना सील केल्यास घुसखोरांमार्फत खरा मास्टरमाईंड सहज जनतेसमोर येईल, त्यामुळे सखोल आणि निपक्ष कारवाई होण्यासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचेही डॉ. माकणीकर यांनी सांगितले.

विमल शहा एवढा माजला असून पॉकेट क्रमांक २आणि ६ ची जागा एमआयडीसी ची फसवणूक करून त्या जागेचे पुनवर्सन न करता तेथील झोपडया हटवण्याआधीच एफ एस आय चा फायदा घेतला आहे.

शासकीय नियमाप्रमाणे प्रत्येक इमारतीमध्ये बालवाडी, समाजकल्यानं केंद्र, सोसायटी कार्यालय देने बंधनकारक असतानाही बहुतांश इमारतीमध्ये जाणीवपूर्वक दिले नाही, ज्या ज्या इमारतीमध्ये या सुविधा दिल्या नाहीत त्या त्वरित देण्यात याव्यात अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या वतीने डॉ माकणीकर व कॅ. श्रावण गायकवाड यांनी केली आहे.

आजपर्यंत २५० पात्र झोपदीधारकांना मागील ३/४ वर्षांपासून भाडे धनादेश दिले नाहीत, स्वतःच्या मालकीच्या झोपडया रिकाम्या करूनही ना त्यांना सदनिका ना भाडे धनादेश मिळाले नाही, ही जनतेची व प्रशासणाची फार मोठी फसवणूक आहे.

भाडे तत्वावर दिलेल्या आणि विक्री झालेल्या गाळे सदनिकांचे सब्लेटिंग व ट्रान्सफर शुल्क आजही एम.आय.डी.सी ना देता हे शुल्क सुद्धा विकासकाने लुबाडले आहे, मात्र: एमआयडीसी ने आजपर्यंत कारवाई का केली नाही?

सदनिकाचे वितरण झाले असतानाही दि १२/११/२०२० रोजीच्या विकासकांच्या यादीतून काही सदनिका वगळण्यात आलेल्या आहेत हे काय गौडबंगाल अद्यापही समजले नाही.

पॉकेट क्रमांक ५ येथील इमारत क्रमांक १ व २ च्या लगत सतत वाहणाऱ्या नाल्यावर संरक्षक भिंत आद्यपही तक्रारी करूनही बांधली नाही, भविष्यात जीवितहानी झाल्यास कोण जवाबदार असेल विकासक की एम.आय.डी.सी प्रशासन?

मूलभूत सुविधा निर्माणाधिन जागेवर हॉटेल्स बांधून विकासकाने तर नियमाचे उल्लंघन करून कायद्याला भीत नसल्याचे सिद्ध केले आहे, विमल शहाच्या बापाची जंगम मालमत्ता असल्यासारखे तो वागत असून त्वरित हॉटेल पाडून जागा एमआयडीसी ने आपल्या ताब्यात घ्यावी.

पॉकेट क्रमांक ९ मध्ये विकासकांच्या एफएसआय इमारती मध्ये व्याख्या केंद्राची पूर्तता न करता व याच इमारतीमध्ये ये आणि बी विंग मध्ये वाहनतळाची राखीव तळघरासाठी अग्निशमन दलाची परवानगी न घेता भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, ही निव्वळ फसवणूक आहे.

झोपडी धारकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी स्थानिक साईट कार्यालय विकासकाने बंद केले असून मूळ झोपडी धारकांच्या मूळ गोची होत आहे, एमआयडीसी प्रशासन सुद्धा डोळे मिटून आहे.

एकाच सदनिकेसाठी एक पेक्षा अनेक जणांना ताबापत्र देऊन सदनिका सदनिका वाटप अंतर्गत प्रचंड आर्थिक गैरव्यवहार करून सर्वांची फसवणूक केली असून याकामी विकासक विमल शहा, महादलाल मुर्जीं पटेल, एमआयडीसी भ्रष्ट अधिकारी यांच्या वर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा.

फक्त आणि फक्त प्रकल्पाच्या सदनिकेतच कशी काय घुसखोरी होत? विकासकाच्या इफ.एस.आय मध्ये का घुसखोरी होत नाही?? हे फार मोटगे षडयंत्र आहे. सदरचा हा घोटाळा १० हजार करोड रुपयां पेक्षा मोठा असून या प्रकरणाची निवृत्त मा. न्यायशीशामार्फत कमिटी गठीत करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी मा. मुख्यमंत्री, मा. उद्योगमंत्री यांना केली असून ३० एप्रिल पर्यंत या प्रकरणाची उकल नाही झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.

शिवाय या तक्रारींमुळे डॉ. माकणीकर व कॅ. गायकवाड यांना व यांच्या परिवाराच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, विकासक विमल शहा व महादलाल मुर्जी पटेल यांच्या कडून खंडणी, चोरी, विनयभंग, बलात्कार व यासारखे खोटे आरोप होऊन अडकविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे आज १३ मार्च २०२१ पासून असे आरोप व जीवित हानी झाल्यास केवळ आणि केवळ विकासक विमल शहा व महादलाल मुरजी पटेल यास जवाबदार धरावे अशी विनंती डॉ माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधी मार्फत केली आहे.