मच्छर धूप अगरबत्ती व वाहनांचा धूळ श्वसनास घातक आजारांना द्यावे लागत आहे निमंत्रण.
✒साहिल महाजन यवतमाळ प्रतिनिधी✒
यवतमाळ:- अस्थमा आणि सिओपीडीमुळे मृत्यूच्या बाबतीत संपूर्ण जगात भारत सर्वात पुढे आहे. भारतात जगाच्या आकडेवारीत 12 टक्के या आजाराचे प्रमान आहे. ही आकडेवारी जगात सर्वाधिक आहे.
पूजेमध्ये वापरण्यात येणारी धूप अगरबत्ती मच्छर अगरबत्ती, चूल आणि वाहनातून निघणारा धूळ सर्वाधिक घातक आहे. ही बाब ग्लोबन बर्डन ऑफ डिसीज रिपोर्ट, 2017 मध्ये उघड झाल्याची माहिती चेस्ट रिसर्च फाउंडेशनचे डायरेक्टर सुधीर साळवी यांनी माध्येमांना दिली आहे. तसेच पाश्चिमात्य देशात अस्थमा आणि सीओपीडी समस्या मुख्यत्वे धूम्रपानामुळे निर्माण झाली आहे. मात्र भारतात 80 टक्के रुग्ण धूम्रपानामुळे नव्हे तर धूप अगरबत्ती, मच्छर अगरबत्ती, चूल आणि वाहनांच्या धुळामुळे त्रस्त आहेत. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना अस्थमा आजार मोठया प्रमाणात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली डॉ. साळवी यांनी यांनी दिली. विदेशात इन्हेलर थेरपी या आजारावर रामबाण उपाय मनून वापरली जाते. 30 वर्षे जुन्या थेरपीला समाजाताच तर वैद्यकीय क्षेत्रातही गैरसमज आहेत. अस्थामा आणि सीओपीडीच्या निदानासाठी स्पायरोमेटरी ट्रस्ट आवश्यक आहे. मात्र याकडेही दुर्लक्ष करण्यात येते, असेही त्यांनी सांगितले. (अस्थाची लक्षणे व कारण) सीओपीडी अर्थात काँनिक आब्सस्ट्रेक्टिव्ह पल्मोनरी डिसीज आहे.
या आजारात धूळ आणि धुरामध्ये सतत संपर्कात असल्यास फुफुसातील श्वसन कोशिका क्षतिग्रस्त होतात. फुफ्फुस काळे पडते. ते कमजोरही होते. यामुळे श्वास घेता दम लागतो अस्थमाच्या तुलनेत सीओपीडीची समस्या अधिक घातक आहे. यामुळे मृत्यूचा अधिक धोका संभवतो.पूर्वी बीढी, सिगारेटमुळे अस्थमा व सीओपीडीची समस्या आढळून आली आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज रिपोर्ट 2017 मध्ये सिगरेटपेक्षा अन्य कारणानंमुळे अस्थमा आणि सीओपीडीची समस्या असल्याचे स्पष्ट झाले. एका दिवसांत चुलीच्या धूळामुळे 25 सिगरेचा धूळ, धूपअगरबत्ती मुळे (15 मिनी? ) 500सिगरेट? व मच्छर अगरबत्तीमुळे (रात्रभर) 100 सिगरेटचा धूळ फुफ्फुसात जातो.